spot_img
अहमदनगरParner News : पारनेरमध्ये उपसरपंचपदाच्या निवडी बिनविरोध, पण या ग्रामपंचायतीत झाला घोळ!

Parner News : पारनेरमध्ये उपसरपंचपदाच्या निवडी बिनविरोध, पण या ग्रामपंचायतीत झाला घोळ!

spot_img

Parner News : पारनेर / नगर सह्याद्री- कान्हूरपठार, वाडेगव्हाण, विरोली, यादववाडी, मावळेवाडी, काकणेवाडी या सहा ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडी [politics] गुरूवारी पार पडल्या. या गावांत ग्रामपंचायत सदस्यांची उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलवली होती. सहाही गावच्या उपसरपंचांच्या निवडी बिनविरोध झाल्या.

कान्हूरपठार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवड करण्यासाठी लोकनियुक्त सरपंच संध्या किरण ठुबे यांच्या अध्यक्षतेखाली, निवडणूक निर्णय अधिकारी तथा पारनेर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई यांच्या उपस्थितीत झाली. प्रभाग क्र. २ मधून विजयी झालेले प्रसाद अशोक नवले यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केला. सदस्य श्रीकांत विठ्ठल ठुबे यांनी अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी विनय शिपाई यांनी प्रसाद नवले यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. त्यानंतर फटायांची आतिषबाजी, गुलालाची उधळण ढोल ताशांच्या निनादात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

वाडेगव्हाण उपसरपंचपदी एकनाथ शेळके यांना संधी मिळाली. त्यांच्या अर्जावर चैताली अमोल यादव यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली. शेळके यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच प्रियंका किशोर यादव, निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार पाचर्णे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. बिनविरोध निवडीनंतर संपत शेळके, प्रमोद घनवट, वसंत शेळके, भानुदास घनवट, अविनाश खंदारे, विजय खंदारे, डॉ. मच्छिंद्र नरवडे, रविंद्र शेळके, सर्जेराव शेळके, गणपत शेळके, अंकुश यादव, शशिकांत गवळी, संदीप गवळी, संतोष पानसरे, दिलीप शेळके, बाळासाहेब सोनवणे, भरत शेळके, लक्ष्मण शेळके, पंढरीनाथ तानवडे, सुरज खंदारे, अमित रासकर, धनंजय झांबरे, रामकिसन शेळके, संदीप शेळके आदींनी सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार केला.

मावळेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुवर्णा कदम यांची निवड झाली. त्यांच्या अर्जावर कांताबाई लोभाजी मावळे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली. विरोली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी लहू बुचूडे यांना संधी मिळाली आहे. अमोल गौतम मोरे त्यांना सूचक होते. काकणेवाडीमध्ये पारुबाई वाळुंज उपसरपंच म्हणून विराजमान झाल्या. वृषाली अनिल वाळुंज त्यांना सूचक होत्या. राजकीय दृष्ट्या संवेदनशील व महत्वपूर्ण असणार्‍या यादववाडीच्या उपसरपंचपदी सागर बाळासाहेब सरडे यांना संधी मिळाली. त्यांना सीमा विशाल तरडे सूचक होत्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्करांच्या घरी राडा? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...

भाजपचे उमेदवार ठरले, आज पहिली यादी? कुणाला मिळणार डच्चू! वाचा सविस्तर…

Politics News : राज्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना दिवाळीपूर्वीच मिळणार खुशखबर!

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. आजच्या दिवशी...

४२ लाखांची रोकड पकडली! नगरमध्ये पैसाच-पैसा? शहरात पुन्हा उडाली खळबळ..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने प्रशासनाला कडक आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या...