spot_img
अहमदनगरAhmednagar Mahapalika news : महापालिकेच्या 'त्या' निर्णयाविरोधात काँग्रेसपाठोपाठ व्यापारी संघटना आक्रमक

Ahmednagar Mahapalika news : महापालिकेच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात काँग्रेसपाठोपाठ व्यापारी संघटना आक्रमक

spot_img

किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची व्यापारी, दुकानदारांशी संवाद मोहीम
Ahmednagar Mahapalika news : अहमदनगर | नगर सह्याद्री – 
मनपा हद्दीतील सुमारे ३५५ प्रकारच्या विविध दुकानदार, व्यापारी आस्थापनांकडून रुपये १५ हजारां पर्यंत व्यवसाय परवाना शुल्क आकारणीच्या निर्णयाला महासभेच्या मंजुरीनंतर प्रशासनाने प्रत्यक्ष अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे. याला शहर काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. त्यानंतर आता विविध व्यापारी संघटना देखील या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली या बेबंदशाही विरोधात जनजागृतीसाठी व्यापारी, दुकानदारांच्या विविध संघटना, असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांच्या भेटीगाठींसह संवाद मोहीम उघडण्यात आली आहे. याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मनपाला काँग्रेसने दिलेल्या निवेदनाचे पत्र व्यापारी संघटनांना दिले जात आहे. महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष मुथा यांनी देखील संघटनेच्या वतीने तीव्र विरोध केला आहे. एमजी रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शामराव देडगावकर, सचिव किरण व्होरा, नंदलाल दोडेजा, सुशील येवलेकर, विशाख वैद्य, संजय भंडारी, आदित्य गांधी, नरेंद्र कटारिया, दीपक तलरेजा, घर संसारचे अशोकशेठ उपाध्ये आदींनी देखील असोसिएशनच्या वतीने सदर निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक संजय झिंजे, कामगार काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, उपाध्यक्ष अलतमश जरिवाला, क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, आनंद जवंजाळ, अभिनय गायकवाड, विजयकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.

काँग्रेसचे एकजुटीचे आवाहन
किरण काळे यांनी आवाहन केले आहे की, शहरात छोट्या-मोठ्या विविध व्यवसायांच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरांमध्ये मिळून सुमारे ८० हून अधिक संघटना आहेत. सर्वांनी एकजूट दाखवावी. आपले दुकान, व्यवसाय जिथे आहे त्या प्रभागाच्या नगरसेवक, त्यांच्या राजकिय पक्षांनी महासभेत ठराव मंजूर केलाच कसा असा जाब प्रत्येकाला विचारावा. हा व्यावसायिकांच्या तिजोरीवर वाजत-गाजत दिवसा-ढवळ्या दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे. हे भूत कायमस्वरूपी मानगुटीवर बसण्यापूर्वीच लोकशाही मार्गाने हाणून पाडण्यासाठी व्यवसायिकांनी एकजूट दाखविण्याचे आवाहन काळे यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...