spot_img
मनोरंजनअभिनेत्री अंकिताला आली अभिनेता सुशांतची आठवण, म्हणाली तो खूप....

अभिनेत्री अंकिताला आली अभिनेता सुशांतची आठवण, म्हणाली तो खूप….

spot_img

मुंबई ः पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या बिग बॉसच्या घरात पती विकी जैनबरोबर सहभागी झाली आहे. येथे ती तिच्या भूतकाळातील घटनांबद्दल बोलत असते. एकेकाळी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतबरोबर रिलेशनशिपमध्ये होती.

तब्बल ७ वर्षांनी त्यांचं ब्रेकअप झालं होतं. बिग बॉस’च्या घरात अंकिताने सुशांतच्या निधनाबद्दल भाष्य केलं. ब्रेकअपबद्दलची त्याची शायरी तिला जुन्या आठवणी आठवून देते. ती म्हणते, या सगळ्या गोष्टी बोलत जाऊ नकोस, त्याचा खूप परिणाम होतो. पण तुझी शायरी चांगली होती, मला खूप आवडली. नंतर ती सुशांतच्या एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील कौन तुझे’ हे गाणं म्हणू लागते.

सुशांतला आठवून अंकिता म्हणाली, तो खूप चांगला माणूस होता. सुशांत विकीचाही मित्र होता, पण तो आता या जगात नाही. सुशांतच्या मृत्यूबद्दल मला आत्ताच काही बोलायचं नाही. खरं तर असं नाही की मला हे तुला सांगायचं नाही पण.. मी त्याच्या अंत्यसंस्कारालाही गेले नव्हते. मी जाऊ शकलेच नाही. मला वाटलं की मी हे पाहू शकत नाही.

विकी म्हणाला होता की तू जाऊन ये. मी नाही म्हणाले. मी कसं पाहू शकले असते? असा अनुभव मी माझ्या आयुष्यात कधीच घेतला नव्हता. मी पहिल्यांदा माझ्या वडिलांना असं पाहिलं. एखाद्याला गमावणे म्हणजे काय असते, ते तेव्हा पाहिले. या सगळ्या गोष्टी आठवून वाईट वाटतं, असं ती म्हणाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...