spot_img
अहमदनगरअहमदनगर मध्ये चाललंय काय ? मुलाला क्लासला सोडायला गेलेल्या महिलेसोबत दानिशने केले...

अहमदनगर मध्ये चाललंय काय ? मुलाला क्लासला सोडायला गेलेल्या महिलेसोबत दानिशने केले ‘असे’ धक्कादायक

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री :
दिल्लीगेट येथे मुलाला लासला सोडायला गेलेल्या महिलेशी गैरवर्तन झाल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी महिलेच्या सासूने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दानीश करीम बागवान असे आरोपीचे नाव आहे.

पीडित महिला शहरात एका परिसरात राहते. ती तिच्या मुलाला १० नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता लासला सोडवण्यासाठी दिल्लीगेट परिसरात गेली होती. परंतु ती घरी येताना अत्यंत भयभीत अवस्थेत आली. तिच्या मागोमाग दानिश हा घरासमोर आला.

ही बाब लक्षात येताच पीडितेच्या सासूने आरोपीस विचारले असता तो तेथून पळून गेला. पीडितेला भयभीत झालेले पाहून सासूने तिला विचारणे केली. तेव्हा पीडितेने दानिश हा माझा पाठलाग करत आला होता.

त्याने माझ्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन यापूर्वीही केले होते. पण भितीपोटी काही सांगितले नाही असे सांगितले. सासूने त्वरित कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध फिर्याद दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...

ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करणाऱ्या कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांच्या कार्याचे अनुकरण करण्याची गरज : मंत्री विखे पाटील

निघोज / नगर सह्याद्री ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करीत कन्हैया दूध उद्योग समूहाच्या माध्यमातून...

डॉ. अनिल बोरगे यांचे आयुक्तांना पत्र, म्हणाले चुकीचा अर्थ लावून…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर...

पाणी आणणे म्हणजे एमआयडीसीत ठेकेदारी करणे नव्हे; मंत्री विखेंचा खा. लंकेंना सूचक टोला

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खा. लंकेंना टोला | कान्हूर पठार येथे मंत्री विखेंचा...