spot_img
अहमदनगरकर्जुले हरेश्‍वरच्या सरपंचपदी सौ. सुनिता मुळे यांची निवड

कर्जुले हरेश्‍वरच्या सरपंचपदी सौ. सुनिता मुळे यांची निवड

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या कर्जुले हरेश्‍वर गावच्या सरपंचपदी सौ. सुनिता तुकाराम मुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्री हरेश्‍वर ग्रामवैभव मंडळाने बहुमताने सत्ता हस्तगत केली होती.

पहिल्या अडीच वर्षासाठी सौ. संजीवनी आंधळे यांची निवड करण्यात आली होती. मंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार सौ. आंधळे यांनी राजीनामा दिल्यानंतर सौ. सुनिता मुळे यांचे नाव अंतिम करण्यात आले.

FILE PHOTO

सौ. संजीवनी आंधळे यांचा राजीनामा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पंकज जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत सरपंचपदासाठी सौ. सुनिता मुळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अर्जाची छाननी होऊन तो मंजूर करण्यात आला. सरपंच पदासाठी विरोधकांनी अर्ज दाखल न केल्याने सौ. मुळे यांची बिनविरोध झाली असल्याचे श्री. जगदाळे यांनी जाहीर केले.

सौ. मुळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच ग्रामपंचायत चौकात फटाक्यांची अताषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. ग्रामदैवत श्री हरेश्‍वर महाराज मंदिरात विजयी सभा होऊन गावच्या विकासाचा रथ सक्षमपणे, सर्वांना विश्‍वासात घेऊन काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ. सुनिता मुळे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार शिवाजी शिर्के, माजी सरपंच साहेबराव वाफारे, माजी सरपंच सौ. संजीवनी आंधळे, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष एकनाथ दाते, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ उंडे यांचीही भाषणे झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...