spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग ! 'या' सोन्याच्या दुकानात लाखोंचे दागिने चोरले

अहमदनगर ब्रेकिंग ! ‘या’ सोन्याच्या दुकानात लाखोंचे दागिने चोरले

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : नगर शहरातील कल्याण ज्वेलरी शॉपमधून लाखो रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. पूजा शाम जगताप (वय 33 वर्ष) यांनी फिर्याद दिली आहे.

पूजा जगताप या कल्याण ज्वेलरी शॉपमध्ये कामास आहेत.6 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास काळा बुरखा घातलेल्या दोन महीला दुकानात आल्या. सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांनी विविध दागिने पाहिले. याचवेळी त्यांनी 2 लाख रुपये किमतीचा नेकलेस व 1 लाख रुपयांचा डायमंड चोरून नेला.

दुकानातील स्टाफने जेव्हा सोन्याची मोजणी केली तेव्हा हा मुद्देमाल चोरून नेल्याची खात्री झाली. स्टाफने यावेळी आजूबाजूस या महिलांचा शोध घेतला. परंतु त्यांचा काही तपास लागला नाही. त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...