spot_img
राजकारणParner: कान्हुरमध्ये राष्ट्रवादीने लावला सुरूंग? भाजपच्या हाती भोपळा; पहा ग्रामपंचायतीचा निकाल एका...

Parner: कान्हुरमध्ये राष्ट्रवादीने लावला सुरूंग? भाजपच्या हाती भोपळा; पहा ग्रामपंचायतीचा निकाल एका क्लिकवर

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री

पारनेर तालुक्यातील सात ग्रामपंचायत निवडणूकीत आमदार नीलेश लंके यांच्या गटाला ६ तर मनसेला १ असे सत्ता समीकरण बनले असून वाडेगव्हाण गावात माजी सभापती गणेश शेळके तर कान्हुर पठारमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांच्या गटाला पराभवाचा धक्का बसला आहे. कारण वाडेगव्हाणमध्ये आमदार निलेश लंके यांचे निकटवर्तीय किशोर यादव यांच्या पत्नी प्रियंका यांना सरपंच पदासाठी ९०३ मतांनी विजयी होवुन वाडेगव्हाण मध्ये नवा विक्रम नोंदविला. तर कान्हुर पठारमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांच्या ४० वर्षाच्या सत्तेला आमदार लंके गटाच्या कार्यकर्त्यांनी सुरुंग लावला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा गड राखण्याचे काम कान्हुर पठार गावासह गटामध्ये आझाद ठुबे यांनी केले आहे. परंतु भाकपच्या या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी या ग्रामपंचायत निवडणुकीत सुरूंग लावला आहे. कान्हूर पठार सरपंच पदासाठी उमेदवार संध्या किरण ठुबे विजयी झाल्या आहेत.

सदस्य पदासाठी विजयी उमेदवार ज्ञानेश्वर बापू ठुबे, सतीश विठ्ठल ठुबे, मंदा दत्तात्रय सोनावळे, प्रसाद अशोक नवले, सविता धनंजय ठुबे, पल्लवी सुशांत ठुबे, श्रीकांत विठ्ठल ठुबे, सुनिता ज्ञानेश्वर गायके, विशाल शंकर लोंढे, शारदा वैभव साळवे, धनंजय वसंत व्यवहारे, गंगुबाई एकनाथ तांबे, स्वप्नाली दीपक लोंढे विजयी झाले आहे. काकणेवाडी सरपंच पदासाठी उमेदवार अशोक पाराजी वाळुंज विजयी झाले. सदस्य पदासाठी विजयी उमेदवार संभाजी पोपट वाळूंज, पारूबाई रभाजी वाळुंज, वृषाली अनिल वाळुंज, नवनाथ सदाशिव वाळुंज, संगीता विजय वाळुंज, गीताराम धोंडीबा वाळुंज, जयश्री अविनाश वाळुंज विजयी झाले आहे. विरोलीत शोभा उत्तम गाडगे विजयी झाले. सदस्य पदासाठी विजयी उमेदवार लहू भाऊ बुचडे, जनाबाई काशिनाथ जपे, शुभांगी लहू गाडगे, अमोल गौतम मोरे, शारदा साहेबराव मते, पांडुरंग गोविंद गाडगे, शांताबाई रभाजी भागवत विजयी झाले आहे.

वाडेगव्हाण सरपंच पदासाठी उमेदवार प्रियांका किशोर यादव विजयी झाल्या. सदस्य पदासाठी विजयी उमेदवार सुमित बाबुराव सोनवणे, शालन श्रीरंग रासकर, संगीता सुभाष सोनवणे, एकनाथ देवराम शेळके, जयश्री बाळू सोनवणे, नंदनी यदु झांबरे, शुभम प्रकाश गाडेकर, चैताली अमोल यादव, तुषार भगवान बोरगे, सुजित रामचंद्र गवळी, प्रियंका प्रवीण शेळके विजयी झाले आहे. जामगाव सरपंच पदासाठी विजय उमेदवार पुष्पा बाळासाहेब माळी यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे, सदस्य पदासाठी विजयी उमेदवार गणेश रोहिदास बर्वे उषा दिलीप पवार मनीषा सोमनाथ बर्वे उत्तम बाळू चौधरी अतुल रावसाहेब पवार अनिता सागर माळी जालिंदर नामदेव खाडे शुभांगी यशवंत केदार बबन पोपट मेहेर शितल आनंदा भुजबळ रोहिणी बाळासाहेब खाडे विजयी झाले आहे. यादववाडी सरपंच पदासाठी उमेदवार राजेंद्र बाळू शेळके विजयी झाले. सदस्य पदासाठी विजयी उमेदवार अजित कुंडलिक ठोंबरे, मीना सुभाष यादव, सुलभा राजेश यादव, सागर सुनील तरडे विजयी झाले आहे. मावळेवाडी सरपंच पदासाठी उमेदवार कल्याणी कांतीलाल भोसले विजयी झाल्या.

६ ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच व मते..
कान्हुर पठार – संध्या किरण ठुबे -१३२ मतांनी विजयी होऊन कान्हूर पठार गावच्या सरपंच पदी निवड
काकणेवाडी – अशोक पराजी वाळुंज-१२३ मतांनी विजयी होऊन काकणेवाडी गावच्या सरपंच पदी विराजमान
विरोली – शोभा उत्तम गाडगे-६४ मतांनी विजयी होऊन विरोली गावच्या सरपंचपदी निवड
वाडेगव्हाण – प्रियांका किशोर यादव ९०३ मतांनी विजयी होऊन वाडेगव्हान गावच्या सरपंचपदी निवड
मावळेवाडी – कल्याणी कांतीलाल भोसले-८७ मतांनी विजयी होऊन मावळेवाडी गावच्या सरपंचपदी निवड
यादववाडी – राजेंद्र बाळू शेळके २१ मतांनी विजयी होऊन यादववाडी गावच्या सरपंच पदी निवड

कान्हुरच्या उपसरपंचपदी सोनु शेळके किंवा श्रीकांत ठुबे नावे चर्चेत
पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार ग्रामपंचायत मध्ये आमदार निलेश लंके व आझाद ठुबे यांच्या गटाला ७ समसमान मते मिळाली आहे.त्यामुळे उपसरपंच पदासाठी समसमान मते पडल्यानंतर एक अधिकचे मत देण्याचा अधिकार लोकनियुक्त सरपंचांना असल्याने उपसरपंचपदावर देखील लंके गटाचा दावा राहणार आहे.त्यामुळे उपसरपंचपदी सोनु शेळके किंवा श्रीकांत ठुबे नावे सध्यातरी चर्चेत आहे.

ठुबे १३५ मतांनी विजयी
कान्हुर पठार ग्रामपंचायत वार्ड क्रमांक २ मध्ये मतमोजणी मशिन मधील मेमरी चिफ मध्ये तांत्रिक अडचण आल्याने निकालास तीन तास उशीर झाला तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी आयोगाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले त्यानुसार प्रयत्न करूनही मशीन चा डिस्प्ले ओपन होत नव्हता त्यानंतर निवडणूक आयोगा च्या मिशन मार्फत मदत घेतली ३ तासांनी मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली संध्या किरण ठूबे यांना १३५ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

आझाद ठुबे यांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरूंग ?
पारनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील महत्त्वपूर्ण व तालुक्याच्या राजकारणात अग्रभागी असणार्‍या कान्हूर पठार ग्रामपंचायतीत तब्बल ४० वर्षांनंतर सत्ताबदल झाला. अ‍ॅड. आझाद ठुबे गटाचा आमदार नीलेश लंके गटाने धुव्वा उडवला. अ‍ॅड. आझाद ठुबे गटाने कॉ. बाबासाहेब ठुबे पॅनेल व आमदार नीलेश लंके गटाने पंचरत्न जय जवान, जय किसान पॅनेल उभे ठाकले असताना सरपंचपदी लंके गटाच्या संध्या किरण ठुबे या १३२ मतांनी विजयी झाल्या. ठुबे गटाच्या रेश्मा सागर व्यवहारे यांचा पराभव झाला. ठुबे गटाने कडवी झुंज देत १३ पैकी ७ जागांवर विजय मिळविला.आमदार नीलेश लंके गटाने सहा जागा व सरपंचप दावर विजय मिळविला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...