spot_img
अहमदनगरAvtar Meherbaba : अवतार मेहेरबाबांच्या समाधी स्थळी ६० हजार मेहेरप्रेमींनी पाळले मौन

Avtar Meherbaba : अवतार मेहेरबाबांच्या समाधी स्थळी ६० हजार मेहेरप्रेमींनी पाळले मौन

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री –
Avtar Meherbaba : ‘बिगिन दि बिगिन’ ही धून पावणे बारा वाजता वाजली, नगर सेंटरच्या सदस्यांनी मेहेरधून म्हटली आणि लाखो मेहेर प्रेमींनी मौन व्रत अंगिकारले.

दुपारी १२ वाजता मौनास सुरुवात झाली. यावेळी सर्वत्र शांतता पसरली. १५ मिनिटांनंतर ‘अवतार मेहेर बाबा की जय’च्या जयघोषात मौन सोडण्यात आले. यावेळी टेकडीवर ६० हजारांवर भाविक होते. अवतार मेहेरबाबांच्या समाधी स्थळी ५५ वी अमर तिथी सोहळा होत आहे. ३१ जानेवारीला मेहेरबाबांनी देहत्याग केला. दुपारी १२ वाजता दौंड रोडवरील मेहराबाद (अरणगाव) येथे सुमारे ६० हजार भाविकांनी मौन पाळले. जगात लाखो भाविकांनी याच वेळेस मौन पाळले.

मंगळवारपासून सुरु झालेल्या अमरतिथी सोहळ्यासाठी हजारो भाविक बसतील असा भव्य मंडप टाकण्यात आला. अवतार मेहेरबाबांनी मौनास सुरवात केल्यावर शेवटपर्यंत मौन पाळले म्हणून आजही महामौन पाळले जाते.सकाळी भजनास सुरवात झाल्यानंतर मेहेरधून म्हटली गेली. त्यानंतर मुख्य मंडपात कार्यक्रम सुरु झाले. बुधवारीही समाधीचे दर्शन घेण्यास मोठ्या रांगा लागल्या होत्या. भारतातून सुमारे लाखांवर मेहेरप्रेमी मेहेराबादकडे येत आहेत. कोठेही गडबड, गोंधळ नव्हता. सांस्कृतिक कार्यक्रम दिवसभर चालू होते. त्यात मेहेर प्रेमींनी भजने, गजल, नृत्ये, कव्वाली, गाणे, नाटिका सादर केल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर मधील जेएसएस स्कूलला १ लाखाचा दंड; नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर महापालिका शिक्षण विभागाने परवानगी नसताना माध्यमिकचे वर्ग भरविणाऱ्या केडगाव येथील...

पारनेर-नगर मतदारसंघातील दबंगगिरी गाडून टाका; आ. काशिनाथ दाते

अकोळनेर येथे आमदार दाते यांचा नागरी सत्कार अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- पारनेर नगर मतदार संघात पाच...

भाजपला धक्का! माजी मंत्र्याची फेर मतमोजणीची मागणी, ८ लाखही भरले; राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ

जामखेड । नगर सहयाद्री:- जामखेड मतदारसंघातील 17 बूथसाठी आठ लाख 2400 रुपये शुल्क भरत...

एमआयडीसी परिसरात अपघात; महिला ठार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एमआयडीसीतील दूध डेअरी चौकात झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. सरिता शरद...