spot_img
अहमदनगर'50 खोके शिंदे को ठोके' ..! संजय राऊतांचा अहमदनगरमधील संवाद मेळाव्यातून घणाघात

’50 खोके शिंदे को ठोके’ ..! संजय राऊतांचा अहमदनगरमधील संवाद मेळाव्यातून घणाघात

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे ठाकरे गटाचा संवाद मेळावा आज सुरु आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर २० जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा घणाघात केला.

ते म्हणाले, आदर्श घोटाळा केलेल्या अशोक चव्हाणांना भाजपने घेतले. 70 हजार कोटींचा घोटाळा केलेले अजित पवार आज भाजप सोबत आहेत. आता घोषणा बदला, 50 खोके ‘शिंदे को ठोके’ असे म्हणा. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार उलटवून टाकायचे आहे आणि रामराज्य आणायचे आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

जे शिवसेनेच्या तिकिटावर वर्षोनुवर्षे निवडून आलेत. ते सोडून गेले, गद्दारी केली, हा शंकर आमच्यासोबत लक्ष्मणासारखा उभा आहे. काल अशोक चव्हाण सोडून गेले, का गेले, आमचे सरकार आल्यावर ही ईडी राहील. अशोक चव्हाण चांगला माणूस पण तो गेला, त्याचे वडील ही मुख्यमंत्री होते. तरीही गेले पक्षाने सर्व दिले तरी गेले. आदर्श घोटाळा सर्वात मोठा घोटाळा, असा आरोप भाजपने केला. तरीही त्यांना पक्षात घेतले.

कारगिलमधील शहीद कुटुंबियांना घर देणार. तिथे मोठी इमारत बांधली, पण एकही शहिद कुटुंबियांना घर नाही, हा आदर्श घोटाळा आहे. 70 हजार कोटींचा घोटाळा केलेले अजित पवार आज भाजप सोबत आहेत. आता घोषणा बदला, ’50 खोके शिंदे को ठोके’ असे म्हणताच एकच हशा पिकला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यात शरद पवारांचीच चर्चा, अजित दादांचा चेहरा पडल्याची कुजबुज

बारामती | नगर सह्याद्री बारामतीत आज (२ मार्च) मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित...

अजित पवारांच्या नाकावर टिच्चून लंकेंनी तुतारी फुंकली !!

| नगरच्या महानाट्यात देवेंद्र फडणवीसांना ठरवले गेले अनाजी पंत | सत्तेचा लाभ उठवत अजित पवार...

सैनिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी व्यवहारे, उपाध्यक्षपदी मापारी

पारनेर | नगर सह्याद्री : पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजीराव व्यवहारे तर...

मराठा समाज एकवटला नगरमधील बैठकीत घेतला ‘असा’ एकमुखी निर्णय

अहमदनगर | नगर सह्याद्री मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभे केले आहे. परंतु...