spot_img
अहमदनगरतलवारीच्या धाकावर लुटणारे ५ आरोपी जेरबंद, ५० हजार जप्त

तलवारीच्या धाकावर लुटणारे ५ आरोपी जेरबंद, ५० हजार जप्त

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : तलवारीच्या धाकावर लुटणारे पाच आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून ५० हजारांची रक्कम जप्त केली. सत्यवान दादा जाधव, गौरव महादेव नाळे,शुभम सुदाम क्षिरसागर (तिन्ही रा.अजनुज, ता.श्रीगोंदा), अरबाज बशीर सय्यद, सलीम शब्बीर बेग (दोन्ही रा.आनंदवाडी, ता.श्रीगोंदा) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर व श्रीगोंदा पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली.

अधिक माहिती अशी : ३० जानेवारी रोजी निलेश नामदेव जाधव (रा.काष्टी, ता.श्रीगोंदा) हे साथीदारासह टेम्पो घेऊन चालले होते. यावेळी सहा इसमांनी तलवारीचा धाक दाखवत मारहाण करत १ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत श्रीगोंदे पोलीस ठाण्यात दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत गुन्ह्याचा तपास करुन आरोपीना अटक करण्याचे सूचित केले होते. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिनांक ६ फेब्रुवारीला पथक तयार करून याबाबत शोध घेत होते.

श्रीगोंदा परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वरील आरोपींनी हा गुन्हा केला आहे. त्यानुसार पोलिसांनी अजनूज गावात सापळा लावून आरोपी ताब्यात घेतले. गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी ५० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही : आमदार दाते यांचे मोठे विधान

पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पारनेर / नगर सह्याद्री रविवार दिनांक ७...

कायनेटिक चौकातील परिसरातील नागरिकांना धोका?, माजी सभापती मनोज कोतकर मैदानात, नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कायनेटिक चौक परिसरातील काही भागात गेल्या 1 महिन्यापासून दूषित पाणी...

सोशल मीडिया बंदीवरुन राडा, तरुणाई संसदेत घुसली, 5 आंदोलकांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी सरकारविरोधात आंदोलन...

…अन्यथा दसरा मेळाव्यात पुढील भूमिका जाहीर करणार; जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम, वाचा सविस्तर

जालना । नगर सहयाद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे...