spot_img
अहमदनगरअवघ्या सव्वा रुपयांत ४१ जोडप्यांनी बांधली लग्नगाठ! 'कोते दाम्पत्याच्या हस्ते २४ वर्षात...

अवघ्या सव्वा रुपयांत ४१ जोडप्यांनी बांधली लग्नगाठ! ‘कोते दाम्पत्याच्या हस्ते २४ वर्षात २३५० वधुंना कन्यादान’

spot_img

शिर्डी । नगर सहयाद्री-
श्रीसाईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने अवध्या एक रुपयात सर्वधर्मिय सामुदायिक सोहळ्याचे आयोजन शिर्डीत करण्यात आले होते. मंगलमय वातावरणात व हजारो वन्हाडींच्या साक्षीने साईनगरीतील सामुदायिक विवाह सोहळ्यात ४१ जोडप्यांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली आहे.

प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष कैलासबापू कोते व सुमित्राताई कोते गेली २४ वर्षे कोणत्याही शासकीय मदतीशिवाय हा उपक्रम राबवत आहेत. आजवर या माध्यमातून सात राज्यातील, २२६ जिल्ह्यातील व ४५० तालुक्यांतील जवळपास २३०० जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत.

संयोजकांच्यावतीने वरांची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीत वरांचे विवाहस्थळी ग्रामस्थांनी स्वागत केले. वधु-वरांना आयोजकांच्यावतीने पोशाख, मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी, साईचरित्र भेट देण्यात आले वन्हाडींना मिष्टान्न भोजन देण्यात आले

कन्यादानाचे भाग्य मिळाल्याचा आनंद
राज्यभरातील २३५० वधुंना कन्यादान करण्याचे भाग्य आम्हा दापंत्याना मिळाले, याचा सर्वाधिक आनंद आहे. घरातील लग्नकार्य समजून कोते परिवार या विवाह सोहळ्यात सहभागी होतो. कार्यक्रमांबरोबरच वधूंना सजवण्यासाठी मेकअप कलाकार असतात.
– सुमित्रा कोते ( माजी विश्वस्त, साई संस्थान)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...