spot_img
अहमदनगर..म्हणून पंतप्रधान मोदी यांचे विकासाचे मॉडेल जगभर गाजत आहे: खा. डॉ. सुजय...

..म्हणून पंतप्रधान मोदी यांचे विकासाचे मॉडेल जगभर गाजत आहे: खा. डॉ. सुजय विखे पाटील

spot_img

पाथर्डी । नगर सहयाद्री 
अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत देशातील सर्वसामान्य माणसापर्यंत विकास पोहचविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यामुळे पंतप्रधान मोदी यांची विकासाचे मॉडेल जगभर गाजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दशकापुर्तीच्या कालखंडाचा उल्लेख करताना सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची १० वर्षे असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भगवानगड येथील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचार सभांना सुरवात केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. मोनिका राजळे,  माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, संजय बडे, तालुका अध्यक्ष मृत्यंजय गर्जे, बाळासाहेब गोल्हार, अजय रक्ताटे, प्रतिक खेडकर, माणिकराव बटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविला आहे. गरीब कल्याण योजनेच्या माध्यामातून ८० कोटी हून अधिक परिवार मोफत धान्य योजनेचा लाभ घेत आहेत. ५० कोटी हून अधिक लोकांना जनधन योजनेचा लाभ मिळाला आहे. ३४ कोटी हून अधिक लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यामातून आरोग्य कवच प्राप्त झाले आहे.

४ कोटी हुन अधिक लोकांचे पीएम आवास योजनेच्या माध्यातून पक्क्या घराचे स्वप्न पुर्ण झाले आहे. तर १४ कोटी हून अधिक लोकांना जल जीवन मिशनच्या रुपाने शुद्ध पाणी मिळाले आहे. मागील १० वर्षात २५ कोटीहून अधिक लोक गरीबीतून मुक्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

यामुळे सामान्य माणसाचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला आहे. देशात मोदींची हमी बोलत आहे. त्यामुळे विरोधकांच्या भुलथापांना मतदार बळी पडणार नाहीत. देशात पुन्हा मोदींचे सरकार येणार असून महायुतीचा प्रत्येक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडुण येणार यात आता कोणतीही शंका उरली नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...