spot_img
महाराष्ट्रमोठी बातमी : रासपच्या महादेव जानकरांचा मतदारसंघ ठरला, बारामती की परभणी? पहाच..

मोठी बातमी : रासपच्या महादेव जानकरांचा मतदारसंघ ठरला, बारामती की परभणी? पहाच..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत आपण महायुतीसोबतच राहणार असल्याचं नुकतंच स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर जानकर यांनी हा निर्णय घेतला. महायुतीने आम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी एक जागा सोडली असल्याची माहिती जानकरांकडून देण्यात आली होती. मात्र ही जागा नक्की कोणती असणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर कुरघोडी करण्यासाठी महादेव जानकरांनाबारामती लोकसभा मतदारसंघातून उतरवलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात होती. मात्र या सगळ्याबाबत आता महादेव जानकर यांनी खुलासा करत आपण परभणीतून लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

महायुतीकडून रासपला परभणीची जागा सोडण्यात आली असून मी स्वत: या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त ‘एबीपी माझा’कडून देण्यात आले आहे. महादेव जानकर यांनीच याबाबतचा खुलासा केल्याने ते बारामतीतून लढू शकतात, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...