spot_img
राजकारण50 हजार कोटी जाहीर करतो, घंटा.. आहेत का तुझ्या हातात? ठाकरे शैलीत...

50 हजार कोटी जाहीर करतो, घंटा.. आहेत का तुझ्या हातात? ठाकरे शैलीत ‘राज’ यांचा हल्लाबोल

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषांची शैली काही निराळीच. त्यांच्या भाषणातून ते नेहमीच विरोधकामावर तोफ डागत असतात. आता त्यांनी मदतीच्या घोषणा जाहीर करणाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, काही लोक घोषणा करतात, पुणे शहरासाठी मी 50 हजार कोटी जाहीर करतो. घंटा…काय आहे तुझ्या हातात? उगाच बुडबुडे सोडू नका, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. मनसेच्या हातात असलेल्या सर्वात स्वच्छ ग्रामपंचायतीला पाच लाखांचा निधी बक्षीस म्हणून देणार असल्याची घोषणाही राज यांनी केली. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी स्वच्छतेचा कानमंत्र दिला. मनसेच्या हातातील जी ग्रामपंचायत असेल त्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीला मी पाच लाखाचा निधी देईल. कमी वाटलं तर जास्त देईन आणि देईनच. यांच्या सारखं नाही. पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला 50 हजार कोटी देत आहे. घंटा. आहेत का हातात तुझ्या? उगाच बुडबुडे फोडायचे. काय वाटेल ते बोलायचं. जे आवाक्यात असेल ते करा, असं सांगतानाच लोकांचे मतरुपाने जे आशीर्वाद आहेत, ते कायम सोबत ठेवा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

दरम्यान त्यांनी यावेळी एक सूचनाही केली. ते म्हणाले की, तुम्ही प्रामाणिक आहात. मेहनती आहात, याबाबत दुमत नाही. पण एक काम करा. गाव स्वच्छ ठेवा. एवढंच सांगायचं आहे. मागे आपण 16 मिनिटाची एक डॉक्युमेंट्री केली होती. महाराष्ट्राचा विकास आराखडा केला होता तेव्हा मी स्वच्छतेचा विषय आणला होता. आपला परिसर स्वच्छ ठेवायला पैसे लागत नाही. फक्त इच्छाशक्ती लागते. स्वच्छता ठेवल्याने रोगराईपासून मुक्ती होते. गावात राहिल्यावर छान वाटलं पाहिजे, असं गाव स्वच्छ ठेवा, असं आवाहन राज यांनी केलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...