spot_img
अहमदनगर..हे तर अन्नात माती कालविण्याचे पाप! 'विधेयक मागे घेण्यासाठी कामगारांचे धरणे आंदोलन'

..हे तर अन्नात माती कालविण्याचे पाप! ‘विधेयक मागे घेण्यासाठी कामगारांचे धरणे आंदोलन’

spot_img

नगर। नगर सहयाद्री
हमाल माथाडी कामगारांच्या अन्नात माती कालविण्याचे पाप हे सरकार करीत असल्याचा आरोप हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.

नगर जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने सरकारने माथाडी सुधारणा विधेयक मागे घेण्यात यावे या व इतर मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, कॉ.बाबा आरगडे, कॉ. अनंत लोखंडे, सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, मधुकर केकाण, शेख रज्जाक शेख लाल, सचिव मधुकर केकाण, बाळासाहेब वडागळे, रविंद्र भोसले, बबन अजबे, संजय महापुरे, सतीश शेळके, नवनाथ महानुर, राजु चोरमले, आदिनाथ चेके, अशोक टिमकरे, नारायण गिते, सुनिल गर्जे, लक्ष्मण वायभासे, बाबा गिते, नवनाथ बडे, पांडूरंग गर्जे, राहुल घोडेस्वार, सुनिल गिते, विष्णू ढाकणे, मच्छिंद्र दहिफळे, भाऊसाहेब वाबळे, अनुरथ कदम, महादेव गर्जे, शेख उबेद, रत्नाबाई आजबे, कमल ढहाणे, लताबाई बरेलिया, मंदाबाई सूर्यवंशी आदिंसह कष्टकरी, हमाल, मापाडी यात सहभागी झाला होता.

यावेळी अविनाश घुले म्हणाले, सध्याच्या माथाडी कामगार कायद्यामुळे राज्यातील कष्टकरी हमाल माथाडी कामगारांना कामाची हमी व सामाजिक सुरक्षा मिळत आहे. हा कायदा देशात पथदर्शक ठरत असतांना या कायद्याचा अभ्यास करुन इतर राज्य आपापल्या राज्यात हा लागू करण्याचा विचार करीत आहेत. मात्र आपल्या राज्यातील सरकार हा कायदा कमकुवत करीत आहे.

जुलै २०२३ मध्ये माथाडी विधेयक ३४ आणून काही विभागातून कायदा हटविणे, कायद्यात अंगभूत असलेली लोकशाही प्रक्रिया संपवून कष्टकरी हमाल माथाडी कामगारांच्या अन्नात माती कालविण्याचे पाप हे सरकार करीत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुधारणा करण्याचे नावाने २०१८ मध्ये विधेयक क्रमांक ६४ आणले गेले. या विधेयकामुळे बाजार समितीचे संपूर्ण चित्र बदलून जाणार आहे. बाजार समित्यांच्या सुधारणेसाठी पारदर्शक व सर्व समावेशक लोकशाही पद्धतीचे प्रक्रिया राबवावी व यात हमाल प्रतिनिधींचे स्थान अबाधित ठेवण्यात यावे, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.

यावेळी माथाडी कायद्याची राज्यभरात अंमल बजावणी व्हावी, माथाडी विधेयक ३४ मागे घेण्यात यावे. पणन संचालकांनी काढलेले परिपत्रक तात्काळ मागे घेण्यात यावे. बाजार समित्यांचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक मागे घ्यावे. माथाडी कामगारांचे पाल्यांना माथाडी मंडळात नोकरी देण्यात यावी. शासकीय धान्य गोदामातील कामे माथाडी कामगारांकडून करुन घेण्यात यावीत. कामगारांची थकबाकी माथाडी मंडळात भरण्यात यावी.

माथाडी कामगारांना पेन्शन लागू करण्यात यावी. रेल्वे माल धक्क्यांवरील माथाडी कामगारांची प्रलंबित फरकाची रक्कम तात्काळ देण्यात यावी. आदि मागण्या शासनास सादर करण्यात आला. कष्टकर्‍यांचे नेते डॉ.बाबा आढाव आजपासून मुंबई येथील आझाद मैदानात आंदोलनास बसले असून, त्यास पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकणी माथाडी कामगारांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोनल करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...