spot_img
राजकारणपवार कुटुंबीयांविषयी आमदार नीलेश लंके यांचे मोठे वक्तव्य, चर्चांना उधाण

पवार कुटुंबीयांविषयी आमदार नीलेश लंके यांचे मोठे वक्तव्य, चर्चांना उधाण

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
देशासह महाराष्ट्राच्या जडणघडणीत व राजकारणात शरद पवार व अजित पवार केंद्रबिंदू असून या दोघांनी एकत्र यावे ही महाराष्ट्राची इच्छा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केले.

आमदार लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठाण व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने खेड शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश दर्गा दर्शन यात्रेस मुस्लिम माता भगिनींचा प्रतिसाद लाभला.

आ. लंके यांनी नवरात्रोत्सवात मतदारसंघातील महिलांसाठी मोहटादेवी दर्शन यात्रेचे आयोजन केले होते. कोजागरी पोर्णिमेचे औचित्य साधून मुंबई शहर व उपनगरात वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी एकविरा दर्शन यात्रेचेे आयोजन केले होते. आता मुस्लिम महिलांसाठी खेड शिवापूर यात्रेचे आयोजन केले आहे.
या यात्रेसाठी नगरसेवक डॉ. सादिक राजे,

फिरोज हवालदार, रमीज राजे, नुर कुरेशी, अन्वरभाई शेख, तौफीक पटेल, जब्बार शेख, मुजीब नवाब शेख, पाकीजा शेख, शेख इमरान, शेख अतिक, शाहरूख शेख आदींनी परिश्रम घेतले. मतदारसंघातील मुस्लिम महिलांसाठी दरवर्षी खेड शिवापूर यात्रेचे आयोजन करण्याची घोषणा आ. लंके यांनी यावेळी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...