spot_img
राजकारणपवार कुटुंबीयांविषयी आमदार नीलेश लंके यांचे मोठे वक्तव्य, चर्चांना उधाण

पवार कुटुंबीयांविषयी आमदार नीलेश लंके यांचे मोठे वक्तव्य, चर्चांना उधाण

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
देशासह महाराष्ट्राच्या जडणघडणीत व राजकारणात शरद पवार व अजित पवार केंद्रबिंदू असून या दोघांनी एकत्र यावे ही महाराष्ट्राची इच्छा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केले.

आमदार लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठाण व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने खेड शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश दर्गा दर्शन यात्रेस मुस्लिम माता भगिनींचा प्रतिसाद लाभला.

आ. लंके यांनी नवरात्रोत्सवात मतदारसंघातील महिलांसाठी मोहटादेवी दर्शन यात्रेचे आयोजन केले होते. कोजागरी पोर्णिमेचे औचित्य साधून मुंबई शहर व उपनगरात वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी एकविरा दर्शन यात्रेचेे आयोजन केले होते. आता मुस्लिम महिलांसाठी खेड शिवापूर यात्रेचे आयोजन केले आहे.
या यात्रेसाठी नगरसेवक डॉ. सादिक राजे,

फिरोज हवालदार, रमीज राजे, नुर कुरेशी, अन्वरभाई शेख, तौफीक पटेल, जब्बार शेख, मुजीब नवाब शेख, पाकीजा शेख, शेख इमरान, शेख अतिक, शाहरूख शेख आदींनी परिश्रम घेतले. मतदारसंघातील मुस्लिम महिलांसाठी दरवर्षी खेड शिवापूर यात्रेचे आयोजन करण्याची घोषणा आ. लंके यांनी यावेळी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पारनेरला

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पारनेरला पारनेर बाजार तळावर राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन पारनेर/प्रतिनिधी : पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या...

कामगाराने लावला मालकाला साडेपाच लाखाला चुना? घडलं असे काही..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- नगर- दौंड रस्त्यावरील हनुमान नगर समोर असलेल्या एस. आर. कन्स्ट्रक्शनच्या साईटवरून...

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला?; शरद पवार यांचे सूचक विधान..

मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्या अगोदर महायुतीने...

विधानसभेला महायुतीची वाढली डोकेदुखी; कारण काय?

पुणे | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षाकडून बैठकांवर बैठका सुरू आहे....