spot_img
आरोग्यऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात लोक जास्त आजारी का पडतात? 'हे' आहेत चार...

ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात लोक जास्त आजारी का पडतात? ‘हे’ आहेत चार कारणे

spot_img

शरद ऋतूची सुरवात होताच पाने गळून पडू लागतात आणि हवा थंड होऊ लागते. अनेक जण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये हंगामी आजारांशी लढताना दिसतात.

या महिन्यात आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. या आजारी पडण्यामागे अनेकदा हवामान बदलाला जबाबदार धरले जाते. या महिन्यांत आजारी पडण्याचे अनेक कारणे आहेत. तापमानातील घट किंवा हवामान बदल हे एकमेव कारण नाही.

1. व्हिटॅमिन डी ची कमतरता
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दिवस लहान होतो. त्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाश कमी पडतो, यामुळे व्हिटॅमिन डी चे शरीरातील उत्पादन कमी होते, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप महत्वाचे असते. यामुळेच या काळात आपल्याला अधिक व्हायरल इन्फेक्शनला सामोरे जावे लागते.

2. लोक जास्त वेळ घरात राहतात
या दोन महिन्यांत लोक बाहेरच्या तुलनेत घरात जास्त वेळ घालवतात. कारण बाहेर थंड हवा असते. इतके लोक एकत्र संपर्कात आल्याने विषाणूचा प्रसार लवकर होतो.

3. डासांची उत्पत्ती होण्यास पोषक काळ
पावसानंतर हवामानात बदल होऊन अनेक ठिकाणी पाणी साचते, त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया ला कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती योग्य ठरते. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत या डासांची संख्या खूप वाढते, त्यामुळे हा आजार पसरतो.

4. निष्काळजीपणा
या ऋतूमध्ये जास्त उष्णताही नसते किंवा जास्त थंडीही नसते. याच काळात लोक निष्काळजीपणा दाखवतात, जसे की पहाटे आणि रात्री उशिरा थंड कपडे न घालणे, कमी तापमानात आंघोळ करणे. अशा चुका अनेकांना महागात पडतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...