spot_img
ब्रेकिंगअंबड संचारबंदीनंतर जालना, बीड, संभाजीनगर जिल्ह्यात इंटरनेट बंद

अंबड संचारबंदीनंतर जालना, बीड, संभाजीनगर जिल्ह्यात इंटरनेट बंद

spot_img

मनोज जरांगे यांचे तीन शिलेदार पोलिसांच्या ताब्यात
जालना | नगर सह्याद्री
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरागे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीत बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. फडणवीस माझ्या विरोधात कटकारस्थान करत आहेत, मला सलाईन मधून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणत जरांगे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केले होते. फडणवीस यांना माझा बळीच हवाय ना तर मी सागर बंगल्यावर येतो माझा बळी घ्या, असं म्हणत जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, राज्य सरकारनं अंबड तालुयात संचारबंदी लागू केल्यानंतर जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले. यानंतर राज्य सरकारने पुढचे पाऊल टाकत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात इंटरनेट बंद केले आहे.

जरांगे हे अंतरवली सराटी पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबेरी गावात रात्री मुक्कामाला होते. सोमवारी सकाळीच जरांगे यांचे तीन समर्थक शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात हे सहकारी सक्रीय आहेत. जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार केल्यानंतर हे तिघेही मुंबईला जाण्याच्या तयारीला लागली होते. यामुळेच २६ फेब्रुवारी सकाळी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

मंत्री भुजबळ यांचे सूचक वक्तव्य
भुजबळ यांनी सोमवारी मनोज जरांगे यांच्यावर बोलण्यास नकार दिला. परंतु न बोलताही त्यांनी आपला संदेश दिला. त्यांनी एकाच दगडात दोन पक्ष्यांना लक्ष केले. भुजबळ म्हणाले की, सध्या अधिवेशन आहे. मला आता तिकडे बघू द्या. जरांगे यांच्यावर काहीच बोलायचे नाही. परंतु मी सध्या दोन जुन्या नाटकांचा अभ्यास करत आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर यांची ही नाटके आहेत. त्यातील एक नाटक म्हणजे गृह खात्याला जाग येते अन् दुसर नाटक म्हणजे सीमेवरून परत जा या दोन्ही नाटकांची जुळवाजुळव करत आहे असे ते म्हणाले.

जरांगे पुन्हा अंतरवालीत, सगेसोयरेच्या मागणीवर ठाम
मनोज जरांगे रविवारी मुंबईकडे निघणार होते. मात्र, राज्य सरकारच्यावतीनं जालना जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानं अंबड तालुयात संचारबंदी लागू करण्यात आली होती. यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा अंतरवाली सराटीत जाण्याचा निर्णय घेतला. अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी सगेसोयरेच्या अधिसूचनेवर ठाम राहणार असल्याचे म्हटले. संचारबंदी उठवल्यानंतर पुन्हा मुंबईकडे सागर बंगल्यावर जाणार असल्याचे मनोज जरांगेंनी सांगितले. याशिवाय जरांगे यांनी आज देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे भांबेरी मधून अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत.

राऊतांकडून फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपांवर उत्तर दिले. फडणवीसांनी जरांगेंचे आरोप फेटाळले असून त्यांचा बोलावता धनी कोण, हे आम्हाला माहिती, असेही त्यांनी म्हटले होते. आता, जरांगेंची पाठराखण करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना राजीनामा मागितला आहे. मनोज जरांगे यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीसांची आहे. यामागचा बोलवता धनी कोण हे जर गृहमंत्र्यांना माहिती नसेल तर फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे. गृहमंत्री काय गोट्या खेळण्यासाठी आहे का?, असा सवाल करत राऊत यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

जे पेराल ते उगवते: वडेट्टीवार
विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. जे पेराल ते उगवते, असे सांगत काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. तसेच मनोज जरांगेंना सल्लाही दिला. ही काही मॅच फिसिंग आहे का? असा सवाल करत, ज्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल ते बोलत आहेत त्यांनी अशी भाषा वापरू नये. सत्ताधारी आणि जरांगे यांच्यामध्ये काय चर्चा झाली हा त्यांच्यातला प्रश्न आहे. मनोज जरांगे यांना असे बोलायला लावणे हे पाप कुणाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. चर्चेसाठी भाजपचेच लोक जात होते. तुम्ही जे पेराल ते उगवते. विश्वास कुणावर ठेवायचा, अशी माणसे फोडून अनेक बंड झाले, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

आंदोलकांनी बस जाळली
जालना जिल्ह्यातील अंबड तालुयात रविवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचारबदी लागू करण्यात आली आहे. त्याच बरोबर मनोज जरांगे यांच्या एका सहकार्‍यासह ५ जणांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच दरम्यान तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथे एक बस (क्रमांक एम एच १४- बी टी १८२२) जाळण्यात आली आहे. त्यानंतर, पुढील १० तासांसाठी बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली होती.दरम्यान, सोमवारी पहाटे पासून पोलिस प्रशासनाने आढावा घेऊन गेवराई आगारातील बस सेवा बंद केल्या आहेत. अचानक बस सेवा बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. गेवराई बस स्थानकामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उपोषणाबाबत सायंकाळी भूमिका जाहीर करणार : जरांगे पाटील
तुम्ही डाव टाकणे बंद करा आणि सगेसोयर्‍याच्या मागे लागा. मराठ्यांची नाराजी ओढावून घेवू नका. ते तुम्हाला परवडणारे नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. उपोषणाबाबत आज सायंकाळी भूमिका जाहीर करणार असल्याचेही ते म्हणाले.गावा-गावात साखळी उपोषण, धरणे आंदोलन करा. जाळपोळ-उद्रेक करू नका. अंतरवाली सराटीतही साखळी उपोषण सुरू होणार असून रोज चौघे उपोषणाला बसणार आहेत. शासनाने आता डाव टाकणे बंद करावे. पोरं जमा करणे, मिडियाद्वारे त्यांच्याकडून बोलून घेणे बंद करा. लोकांचा वापर करू नका. यामुळे तुमचे राजकीय करिअर घडणार नाही. आज सायंकाळी ५ वाजता स्पष्ट भूमिका मांडणार आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची नाराजी ओढावून घेवू नये. कॅबिनेटमध्ये आज पहिल्या दिवशी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा, अंतरवाली सराटीसह राज्यातील गुन्हे मागे घ्या, हैदराबादचे गॅझेट घ्या. कितीही दबाव आणला तरी मी या मागण्यांपासून हटणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Sujay vikhe patil : ‘विखे कुटुंबीयांचे योगदान जनता विसरणार नाही, विखेंनाच निवडून देतील’

राहुरी / नगर सह्याद्री Sujay vikhe patil : विखे कुटुंबीयांनी गेली तीन पिढ्यापासून जिल्ह्यासाठी...

मंदिरचा चौथरा पाडला, ग्रामस्थ आक्रमक; नगर तालुक्यातील ‘या’ गावात घडला प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री नवनागापूरमध्ये छत्रपती नगर परिसरात आठ महिन्यापूर्वी लोकवर्गणीतून ओपन स्पेसमध्ये बांधलेले शनी...

सुजय विखेंच्या रॅलीत झळकले संदीप कोतकरांचे बोर्ड…

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ कोतकर यांची भव्य बाईक रॅली अहमदनगर | नगर...

Ahmednagar crime : अतिक्रमणावरून गौरी घुमट परिसरात राडा

अहमदनगर | नगर सह्याद्री Ahmednagar crime : अतिक्रमण काढण्यावरून गौरी घुमट परिसरात दोन गटात हाणामारीची...