गट, गणांची रचना जवळपास मान्य, श्रीरामपूर, नेवासे, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यांत एकही हरकत नाही
अहिल्यानगर । नगर सहयाद्री
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत सोमवारी 21 जुलैपर्यंत तब्बल 88 तक्रारी दाखल झाल्या आहे. 14 जुलैला राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक विभागाने जिल्ह्यातील गट आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. या रचनेवर 21 तारखेपर्यंत हरकत दाखल करण्यास मुदत होती.
ही मुदत काल सायंकाळी सहा वाजता संपली. जिल्ह्यात गट आणि गणाच्या रचनांवर अवघ्या 82 हरकती दाखल झाल्या असून यात देखील एकट्या जामखेड तालुक्यातील 42 हरकतींचा समावेश आहेत. तर श्रीरामपूर, नेवासे, शेवगाव, पाथ्रडी या चार तालुक्यांत एकही हरकत दाखल झालेली नाही. यामुळे जिल्ह्यातील गट आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना जवळपास सर्वांना मान्य असल्याचे दिसत आहे. दरम्यान दाखल हरकतीमध्ये गट व गणातून गाव वगळणे तसेच समावेश करणे अशाच स्वरूपाच्या आहेत.
सोमवारी 14 जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण याचा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केला होता. यावर सोमवार 21 जुलैपर्यंत हरकती व सुचना देण्याची शेवटी मुदत होती. या मुदतीमध्ये 88 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 14 जुलै रोजी जिल्हा परिषदेचे 75 व पंचायत समितीचे 150 गणांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांची नावे व नकाशा जाहीर केला होता.
2011 च्या लोकसंख्येच्या आधारवर प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केला होता. झेड पद्धतीने हा आराखडा तयार करण्यात आला. अकोल्याच्या समशेरपूर पासून ते जामखेडच्या खर्डापर्यंत असा हा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाल्यानंतर हरकती व सुचना पाऊस पडेल असे वाटले होते. प्रत्यक्षात मात्र 88 तक्रारी आल्या असून सर्वाधिक जामखेडच्या 40 तक्रारी आहे.
गटातील गाव या गट व गणात पाहिजे होते. किंवा या गावाचा समावेश या गट व गणात करण्यात यावा, गट व गणाचे नाव पूव जे होते तेच ठेवण्यात यावे, पूव ज्या गट व गणात गाव होते त्याच गट व गणात ते ठेवण्यात यावे, दोन गावांची ग्रुप ग्रामपंचायत असून एक गाव या गणात तर दुसरे गाव त्या गणात गेले आहे. ते एकाच गणात ठेवण्यात यावे अशा स्वरूपांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
तालुकानिहाय तक्रारी
तालुकानिहाय तक्रारीची संख्या पुढील प्रमाणे आहे. अकोले- 8, संगमनेर- 6, कोपरगाव- 3, राहाता- 3, अहिल्यानगर- 9, राहुरी- 1, पारनेर- 13, श्रीगोंदा- 1, कर्जत- 3, जामखेड- 40 तर श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथ्रडीया चार तालुक्यातून एकही तक्रार दाखल झाली नाही. अर्थात एकाच गट व गणासाठी अनेकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे जामखेडमध्ये तक्रारीची संख्या वाढली आहे.