spot_img
अहमदनगरतुमचा करेक्ट कार्यक्रम! आता कसं वाटतंय…; अजित पवारांनी महाविकास आघाडीला डिचवलं

तुमचा करेक्ट कार्यक्रम! आता कसं वाटतंय…; अजित पवारांनी महाविकास आघाडीला डिचवलं

spot_img

मुंबई ।नगर सहयाद्री:-
राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानंतर अभिनंदनासाठी केलेल्या भाषणावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, असा टोला त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे बघून लगावला. तर लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं. आता कसं वाटतंय, गरम वाटतंय की कसं तुम्हीच बघा, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला डिवचले.

अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देतो. नेतृत्त्व गुणांची त्यांची ही पोचपावती आहे. ⁠तुमच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून झाली. मी तुम्हाला म्हटलो की, लोकसभा निवडणूकीत तुम्ही उभं रहा, जर अपयश आलं तर तुम्हाला या सभागृहात संधी देऊ, असे म्हटले होते. ⁠मी तुम्हाला इकडे आणले आणि देवेंद्र फडणवीस हे तु्म्हाला तिकडे घेऊन गेले.

अजित पवार पुढे म्हणाले की, निवडणूक काळात काही लोक संविधान हातात घ्यायचे. मात्र संविधान हातात घेतलं की, आदर वाढतो. ⁠म्हणजे बाकीच्यांना आदर नाही का? एकनाथ शिंदे म्हणाले की कोर पान होती. त्यात मला जायचे नाही, असे त्यांनी म्हटले. तर विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदारकीची शपथ घेतली नाही. यावरून अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

‘मी म्हटलं होतं की आज नाही शपथ घेतली तर उद्या घेतील आणि तसेच झाले. निवडणूक घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. काही तरी स्टंटबाजी करायची. आम्हाला ही मारकडवाडी संदर्भात आदर आहे. ⁠लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, असा टोला त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे बघून लगावला.

लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं. आता कसं वाटतंय गरम वाटतंय की कसं तुम्ही बघा, असे म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीला डिवचले. 237 महायुतीचे निवडून आले. ⁠कधीही ही एवढे निवडून आले नाही. ⁠आता तरी डोळे उघडा. लाडक्या बहि‍णींनी आम्हाला इथं बसवलंय, असा फटकेबाजी अजित पवारांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नववर्षाला दिल्ली हादरली; अख्ख कुटुंब संपवलं, पाच जणांच्या हत्येने खळबळ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - देशभरात सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करत असतानाच...

‘आरोपींना अटक करा नाही तर आम्हाला गोळ्या घाला’

बीड / नगर सह्याद्री मस्साजोगमध्ये गावकऱ्यांनी आज सामूहिक जलसमाधी आंदोलन पुकारलं. सरपंच संतोष देशमुख...

वाल्मिक कराडचा पाय खोलात; रात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

बीड / नगर सह्याद्री - Walmik Karad Sent to Police Custody: गेल्या तीन आठवड्यांपासून...