Politics News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत झाली होती. या लढतीत महायुतीने विजय मिळवला आहे. मात्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत आता ते सर्वात कमी वयाचे उमेदवार ठरले आहेत.
सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत झाली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. रोहित पाटील यांनी शरद पवार गटाकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण, रोहित पाटील यांनी 27 हजार 644 मतांनी विजय मिळवला आहे. रोहित पाटील यांना 1 लाख 28 हजार 403 मते मिळाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पराभूत उमेदवार संजयकाका पाटील यांंना 1 लाख 759 मते मिळालीआहेत. या मतदार संघात नोटाला 528 मते मिळाली आहेत. दरम्यान, रोहित पाटील यांना मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे ते तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आता सर्वात कमी वयाचे उमेदवार ठरले आहेत.