Maharashtra Crime News : डोंबिवलीमधील डायघर परिसरातील खाडीत एका सुटकेसमध्ये २५ महिलेचा मृतदेह सापडला आहे. डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पलावा सिटीजवळ देसाई खाडीत हा मृतदेह सापडलाय. पोलिसांना दुपारी याबाबत माहिती मिळाली होती. दरम्यान खाडीत मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक, क्राइम ब्राच,फॉरेन्सिक पथकासह दाखल झालेत. त्यांनी पंचनामा करून मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे शवविच्छेदनासाठी रवाना केला आहे. मृतदेहाची ओळख पटवून हत्येच्या गुन्ह्याचा तपास डायघर पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, महिलेवर अत्याचार झाले असावेत. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.
त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून खाडीत फेकला असावा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. दरम्यान महिलेचा मृत्यू कशामुळे झाला? तिची ओळख काय आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्याचबरोबर सुटकेस खाडीत टाकली होती का खाडीच्या पाण्यात वाहून आली, याचाही पोलीस तपास करत आहेत.



