अहिल्यानगर | नगर सह्याद्री
इथे गांजा पिवू नका इथून निघून जा असे म्हटल्याचा रागा आल्याने आरोपींनी एकास चॉपर व कोयत्याने मारहाण केल्याची घटना बोल्हेगाव परिसरात घडली. पोलिसांत तक्रार दिली तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
करण संतोष कदम (वय-१९ वर्ष, धंदा वॉचमन, रा. खातगाव टाकळी, ता. नगर) यांच्या जबाबावरून राहुल साबळे (पूर्ण नाव माहित नाही), यश शिरसाठ, नयन पाटोळे व अनोळखी महिला अशा चोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, फिर्यादी व त्यांचे वडिल एक वर्षापासून भंडारी कंस्ट्रक्शन बोल्हेगाव नायरा पेट्रोलपंपासमोर सेक्युरिटी गार्ड म्हणून ड्युटी करतात. ३० डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वडील कस्ट्रक्शन साईटवर गेले होते. तेथे साईटवर दोन इसम व महिला आले. त्यांना इथे गांजा ओढू नका इथून निघून जा असे म्हटल्याचा राग आला. व वाद घालून मारहाण व शिवीगाळ केली आणि पळून गेले. तसेच दहा, पंधरा मिनिटांनी साथीदारांसह परत आले. तू जास्त माजला का तुझ्या बापाची प्रॉपर्टी आहे का असे म्हणून चॉपरने डोक्यात मारले, तसेच एकाने कोयत्याने मानेवर मुक्कामार दिला. तिसर्याने दगडाने मारहाण केली. वडिल आल्याने ते पळून गेले. वडिलांनी डोक्यातून रक्त येत असल्याने सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. जखमी करण कदम यांच्या फिर्यादीवरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.