नगर सह्याद्री टीम : आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. यामध्ये यूट्यूब हे अत्यंत लोकप्रिय झालेले साधन आहे. परंतु यामधून कमाई देखील करता येते हे तुम्हाला माहित आहे का? अनेकांनी यूट्यूबला आपला व्यवसाय बनवला आहे. यातून लोक भरपूर कमाई करत आहेत.
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे यूट्यूब चॅनल तयार करणे खूप सोपे आहे. कोणीही ते विनामूल्य बनवू शकते. तुमच्याकडे कोणताही खास कण्टेण्ट असेल तर किंवा विशेष प्रतिभा असल्यास, तुम्ही YouTubers बनून देखील कमवू शकता. पण YouTube वरून कमाई करण्याचे काही नियम आहेत. जर तुम्हाला YouTube वरून कमाई करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलची मोनेटाइज करावे लागेल. यासाठी 1000 सब्सक्राइबर आणि 4000 तासांचा वॉचटाइम असणे आवश्यक आहे. परंतु तुमच्याकडे सब्सक्राइबर्स आणि वॉचटाइम कमी आहे, तरीही तुम्ही YouTube वरून पैसे कमवू शकता. कसे ते पाहुयात….
YouTube पार्टनर बना आणि जाहिरातींसह पैसे कमवा
तुम्ही YouTube वरून पैसे कसे कमवायचे असा प्रश्न विचारत असाल, तर तुम्हाला YouTube पार्टनर प्रोग्राम माहिती असला पाहिजे आणि ते कसे कार्य करते याची माहिती असणे महत्त्वाचे आहे.
YouTube निर्माते त्यांच्या कोणत्याही व्हिडिओंमधून पैसे कमवू शकत नाहीत जोपर्यंत त्यांचे चॅनेल YouTube वरून मॉनिटाईझ झालेले नाही. यासाठी 1000 सदस्य आणि 4000 तासांचा वॉचटाइम असणे आवश्यक आहे. YouTube मोनेटाइजेशन म्हणजे YouTube व्हिडिओंवर जाहिराती सुरू करण्याची परवानगी घेणे. यासाठी यूट्यूब चॅनेलने मोनेटाइजेशन इनेबल करणे आवश्यक आहे. ते इनेबल होताच, वापरकर्त्याचा YouTube सोबत एक करार होतो , ज्या अंतर्गत मोनेटाइजेशन केलेल्या प्रत्येक चॅनेलच्या मासिक कमाईपैकी YouTube 45% वजा करते आणि चॅनलचे उरलेले एकूण उत्पन्न Google Adsense वर पाठवते, जे युजर्स त्याच्या खात्यात ट्रान्सफर करू शकतो.
YouTube Premium
चॅनेलवर जाहिराती चालवण्याव्यतिरिक्त, तुम्ही YouTube Premium वरून देखील पैसे कमवू शकता. YouTube Premium ही एक Paid मेंबरशिर सर्विस आहे जी लोकांना जाहिरातींशिवाय व्हिडिओ पाहण्याची परवानगी देते. जर YouTube Premium यूजर तुमचे व्हिडिओ पाहत असतील, तर अशा प्रकारे तुम्ही अतिरिक्त कमाई करू शकाल. प्रीमियम सदस्यांना तुमचे व्हिडिओ डाउनलोड करण्याची आणि पाहण्याची संधी मिळते.
Channel Memberships
जेव्हा तुमच्या YouTube चॅनेलला 30,000 पेक्षा जास्त सब्सक्राइबर्स मिळतात, तेव्हा तुम्ही तुमच्या एकूण उत्पन्नामध्ये आणखी एक उत्पन्न जोडण्यासाठी चॅनल Memberships चा लाभ घेऊ शकता. येथे लोक Memberships साठी दरमहा $4.99 देतात. या Memberships चे फायदे असे आहेत की याद्वारे तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकर पोहोचतात. याशिवाय लाइव्ह चॅटसारख्या सुविधाही यूजर्ससाठी उपलब्ध आहेत.
सुपर चॅटद्वारे लाइव्ह स्ट्रीममधून कमाई करा
सुपर चॅट हा YouTube वरून पैसे कमवण्याचा एक अतिशय छान आणि नवीन मार्ग आहे. हे वैशिष्ट्य तुमच्या दर्शकांना खास चॅट मेसेज खरेदी करू देते आणि काही प्रकरणांमध्ये त्यांना लाइव स्ट्रीमच्या कमेंट मध्ये शीर्षस्थानी पिन करू देते. त्यामुळे तुम्ही YouTube वर लाइव जाता तेव्हा, तुम्ही तुमच्या स्ट्रीम द्वारे कमाई करण्यासाठी सुपर चॅट वापरू शकता.