spot_img
अहमदनगरतुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांचा खर्चपाणी तिथूनच चालतो, ते तुम्हाला काय...

तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांचा खर्चपाणी तिथूनच चालतो, ते तुम्हाला काय पाणी देणार?, माजी खासदार विखेंची खासदार लंके यांच्यावर टीका!

spot_img

कान्हूरपठार। नगर सहयाद्री:- 
पठार भागाला पाणी मीच देणार, असे आश्वासन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिले. कान्हूरपठार (ता.पारनेर) येथे गुरुवार दि. २८ रोजी कार्यनवित्त होणाऱ्या सिंचन योजनेच्या सर्वंक्षणाचा शुभारंभ माजी खासदर डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

या सोहळ्यात भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग आणि आमदार काशिनाथ दाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वडगाव दर्या निसर्ग पर्यटन केंद्रासाठी एकूण 9 कोटी रुपयांचा प्रस्तावित निधी असून, त्यातील पहिला टप्पा म्हणून 1.80 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

या निधीअंतर्गत प्रकल्पाचे विविध विकासकामे हाती घेण्यात येणार असून, ग्रामीण पर्यटनाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कान्हूर पठार भेटीत दिलेल्या आश्वासनानुसार, पारनेर तालुक्याच्या आवर्षणग्रस्त भागाला पाणी देणाऱ्या महत्त्वाकांक्षी सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. या सोहळ्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 अंतर्गत सौर प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले. या योजनेतून शेतकऱ्यांना स्थिर व पर्यावरणपूरक वीजपुरवठा होणार असून, शेती सिंचनासाठी मोठा आधार निर्माण होणार आहे.

याप्रसंगी दादासाहेब सोनावळे, वसंतराव चेडे, महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, माजी सभापती गणेश शेळके, राजाराम एरंडे, नगरसेवक युवराज पठारे, अब्बास मुजावर, विक्रम कळमकर, दत्ता नाना पवार, डॉ. भाऊसाहेब खिलारी, सुभाष दुधाडे, सुषमा रावडे, सुधामती कवाद, संदिप वराळ, शिवाजी खिलारी, सखाराम ठुबे, वसंतराव ठुबे, अर्जुन नवले, सुयश वाळूंज, बबन व्यवहारे, कानिफनाथ ठुबे, सुशांत ठुबे, अनिकेत ठुबे, भरत ठुबे, आकाश सोनावळे, संदीप ठुबे, संपत लोंढे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विखे परिवाराने दिलेला शब्द पूर्ण करणार
जे माझी टिंगल करतात किंवा माझ्यावर हसतात ते लोक मला आवडतात. राजकारणात हार जित चालू असते. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही तर काम महत्वाचे आहे. पठार भागाची सिंचन योजना नारळ फोडण्याचा पलीकडे गेली आहे. प्रत्येक वेळेस पश्चिमेकडील मंत्र्यांनी नारळ फोडला, त्यामुळे पठार भाग वंचित राहिला आहे. परंतु विखे पाटील परिवाराने दिलेला शब्द मीच पूर्ण करणार असल्याची ग्वाही माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली

पाणी पारनेरला मिळणार 4 टीएमसी अतिरिक्त पाणी
लोकसभेच्या निवडणुकीत जी चूक केली ती विधानसभेत दुरुस्ती गेली. आमदार दाते यांचा सारखा शिक्षित आमदार तालुक्याने निवडून दिल्याने योजना मार्गी लागत आहे. डिंभे माणिक डोह बोगदयाचे काम झाल्याशिवाय पाणी मिळणार नाही. त्यामुळे दोन महिन्यांत हे काम सुरू करण्यात येणार आहे. कुकडी कालव्यातून 4 टीएमसी अतिरिक्त पाणी पारनेरला मिळणार असल्याची माहिती माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.

सत्तेचा वापर फक्त विकास कामांसाठी
टक्केवारी, दहशत करण्यासाठी साठी सत्ता नको, सत्तेचा वापर विकास कामांसाठी झाला पाहिजे. पठार भागाच्या पाण्यासाठी स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्या पासून संघर्ष सुरु आहे. पुणे जिल्ह्याबरोबर लढण्याची हिम्मत फक्त विखे पाटील कुटुंबामध्ये आहे. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी पाण्याचे पाहिलेले स्वप्न आपण पूर्ण करणार असल्याचे माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.

चार योजनेचा निधीसाठी साकडे
ज्या दिवशी मी निवडणूक जिंकली त्याच दिवशी या पठार भागावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्फत तालुक्यातील चारही पाणी योजना मार्गी लावण्याचा निश्चय केला. चारही योजनेचा डीपीआर करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे साकडे घातले. पठार भागांवरील सर्व शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी ही पाणी योजना अत्यंत महत्व पूर्ण असल्याने ही योजना मंत्री विखे पाटील यांच्या मार्फत पूर्ण होणार आहे.
– आमदार काशिनाथ दाते

पाण्यासाठी लढा अविरत राहणार
कान्हूरच्या इतिहासात एवढ्या प्रमाणात रस्त्यांची कामे यापूर्वी कधीच झाली नव्हती. तब्बल चार कोटी रुपयांच्या रस्त्याची कामे मार्गी लागली आहे, राजकारणासाठी विकास कामे करण्यात काही दुमत नाही. माझ्या जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत पाण्यासाठी लढत राहणार. झेडपी इलेक्शन पर्यंत पाण्याच्या निधीची प्रमा दिली तर मी निवडणूक लढवणारही नाही.
– भाजप नेते विश्वनाथ कोरडे

कान्हूरपठार गटातून निवडणूक लढवणार; जिल्हाध्यक्ष सावंत
पठार भागाला केवळ पाण्याचे स्वप्न दाखवून निवडणुका लढल्या गेल्या. तीन वेळा योजना सर्व्ह झाली, पण लाईट बिल कोण भरायचे, या कारणावरून ती रखडली. मात्र आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असल्याने या योजनेस कोणतीही अडचण येणार नाही. तालुक्यात झेडपी निवडणुकीत कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. अन्यथा सर्व उमेदवार पराभूत होतील. जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली गेली, तर मी स्वतः कान्हूरपठार गटातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी व्यक्त केले.

खासदार नीलेश लंके यांच्यावर नाव न घेता टीका!
पुणे जिल्ह्याशी लढाई करायची असेल, तर ती धमक फक्त विखे पाटील कुटुंबामध्येच आहे. जे लोक नांगर टाकतात, तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं, पण त्यांचा आवाज निघू शकत नाही. त्यांचा खर्चपाणी तिथूनच चालत आहे. ते तुम्हाला काय पाणी देणार? असा प्रश्न उपस्थित करत सुजय विखे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ज्यांचं अस्तित्वच पुणे जिल्ह्यामुळे आहे, ते तुमच्या मुलांना भविष्य देऊ शकतात का, याचा विचार करा, असा सल्लाही त्यांनी नागरिकांना दिला. येणाऱ्या काळात तुम्ही विचार करा, एवढीच माफक अपेक्षा आहे, आशी परखड टीका खासदार नीलेश लंके यांचे नाव न घेता केली.

पुण्याविरुद्ध अहिल्यानगरचा पाण्यासाठी संघर्ष!
पाण्याचा संघर्ष हा केवळ विकासाचा नाही, तर तो पुण्याविरुद्ध अहिल्यानगरचा आहे! हा संघर्ष कै. बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार यांच्यातील होता असे स्पष्ट करत पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने अहिल्यानगरला पाणी मिळू दिले नाही, ही कुकडी कालव्याची कटू पण खरी वास्तविकता असल्याचे मत मांडले. अहिल्यानगर सुजलाम सुफलाम होऊ नये, ही संकल्पना पुणे जिल्ह्यातील नेत्याची होती. म्हणूनच आजवर या भागाला पाणी मिळाले नाही,असा स्पष्ट आरोप सुजय विखे पाटील यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात हळहळ! दुर्घटनेत १७ जणांचा अंत, काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही...

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, सरकार सावध, विखे पाटील म्हणाले, आम्ही…

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने...

सासऱ्यासह पत्नीवर कोयत्याने सपासप वार; सावेडी उपनगरात दारुड्या पतीचा भयंकर कांड

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील वैदुवाडी येथे दारुच्या नशेत पती अर्जुन राजू शिंदे याने...

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार शनिवारी नगर शहरात; अरुण पाटील कडू यांचा अभीष्टचिंतन सोहळा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रांत योगदान देणारे ज्येष्ठ नेते,...