spot_img
देश“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता... ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल अमेरिकेने उडी घेतली असून, इराणच्या अणु प्रकल्पांवर हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या या हल्ल्यांवर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. इराणनेही अमेरिकेच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. अशात आता इराणच्या लष्करी प्रवक्त्याने सोमवारी अमेरिकेला कडक इशारा दिला आहे.

एका व्हिडिओ निवेदनात इराणच्या लष्करी प्रवक्त्याने म्हटले आहे की, अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणकडे कायदेशीरपणे हल्ले करण्याचे पर्याय वाढले आहेत. इराणच्या खातम अल-अंबिया केंद्रीय लष्करी मुख्यालयाचे प्रवक्ते इब्राहिम झोलफकारी यांनी म्हटले आहे की, अमेरिकेला त्यांच्या कृतींचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘गॅम्ब्लर’ असा उल्लेख करत बदला घेण्याची शपथ घेतली.
झोलफकारी यांनी त्यांच्या व्हिडिओ निवेदनाच्या शेवटी इंग्रजीत म्हटले की, “गॅम्ब्लर मिस्टर ट्रम्प, हे युद्ध तुम्ही सुरू केले असेल, पण ते संपवणारे आम्हीच.” दरम्यान, इराणच्या लष्कराने आधीच सांगितले आहे की, ते त्यांच्या अणु प्रकल्पांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देतील.

यापूर्वीच्या एका निवेदनात संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत अमीर सईद इरावनी यांनी म्हटले आहे की, फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान अणु प्रकल्पांवरील अमेरिकेच्या हल्ल्यांना कधी आणि कसे प्रत्युत्तर द्यायचे, हे इराणी सैन्य ठरवेल.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, इराणच्या अणु प्रकल्पांवर त्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे इराणचे मोठे नुकसान झाले आहे.

ट्रम्प असा दावा करत असले तरी, उपग्रह छायाचित्रांमध्ये इराणच्या अणु प्रकल्पांचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचबरोबर, अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इराणने अणु प्रकल्पांमधील युरेनियम हवाई हल्ल्यांच्या आधीच हलवून अमेरिका आणि ट्रम्प यांना वेड्यात काढले असावे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांनंतर इराणने कोणताही बदला घेण्याचे प्रयत्न करू नये, असे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, इराण सरकारने आता शांतता प्रस्थापित करावी, अन्यथा भविष्यातील हल्ले खूप मोठे असतील. ट्रम्प यांच्या या विधानामुळे मध्य पूर्वेतील संघर्ष आणखी वाढण्याची चिंता वाढली आहे.

अमेरिकेने इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर बंकर-बस्टर बॉम्ब आणि दोन डझनहून अधिक टोमाहॉक क्षेपणास्त्रांसह मारा केला, असे जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी पत्रकारांना सांगितले.

इराणच्या एका निर्णयाने जगात खळबळ; होर्मूझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी, काय होणार परिणाम?
इस्रायल-इराण युद्ध ११ दिवसांपासून सुरू आहे आणि अमेरिकेच्या प्रवेशानंतर ते अधिक तीव्र झाले आहे. इराणच्या तीन अणुस्थळांवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, इराणी संसदेनेही धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यास घाईघाईने मान्यता दिली आहे. हा एक जगातील प्रमुख सागरी तेल मार्ग आहे, ज्याद्वारे जगातील कच्च्या तेलाचा २६ टक्के व्यापार होतो. यामध्ये व्यत्यय आल्यास तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते आणि महागाई वाढू शकते. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली तर भारतावर त्याचा परिणाम काय होईल याविषयी सरकारकडून उत्तर देण्यात आले आहे. या चर्चांवर बोलताना पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे की,”त्यातील व्यत्ययाचा देशावर फारसा परिणाम होणार नाही. तसेच पुरवठ्यावरदेखील याचा कोणताही परिणाम नाही”

अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर हल्ले वाढवले ​​असताना, रविवारी इराणच्या संसदेने जागतिक तेल आणि वायू व्यापारासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यास मान्यता दिली. या धमकीनंतर काही तासांतच, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक निवेदन जारी करून भारतीयांना आश्वासन दिले की,”आमची ऊर्जा सुरक्षा अबाधित राहील.आमचा तेल पुरवठा विविध करण्यात आला आहे आणि बहुतेक पुरवठा होर्मुझमधून होत नाही आणि अशा परिस्थितीत पुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नाही” असे म्हटले आहे.

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिलेले आश्वासन
हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये,’आम्ही गेल्या दोन आठवड्यांपासून मध्य पूर्वेतील भू-राजकीय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या काही वर्षांत आमच्या तेल पुरवठ्यात विविधता आणली आहे आणि आता आमच्या पुरवठ्याचा मोठा भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत नाही.’ असे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, आमच्या तेल वितरण कंपन्यांना अनेक आठवड्यांचा तेल पुरवठा असतो आणि तो इतर अनेक मार्गांनी आणला जात आहे.” पेट्रोलियम मंत्र्यांनी भारतीयांना,”आम्ही आमच्या नागरिकांना इंधन पुरवठ्याची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलू” असे आश्वासन दिले आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी का खास आहे?
होर्मुझची सामुद्रधुनी का खास आहे. कारण जगातील कच्च्या तेलाच्या व्यापारासाठी हा एक प्रमुख सागरी मार्ग आहे, जो इराणच्या नियंत्रणाखालील क्षेत्र आहे. या मार्गाने आखाती देशांमधून कच्च्या तेलाचा आणि वायूचा पुरवठा केला जातो. समोर आलेल्या माहितीनुसार, जर यामध्ये काही व्यत्यय आला किंवा तो बंद झाला तर त्याचा परिणाम अमेरिका तसेच भारतासह अनेक युरोपीय देशांवर स्पष्टपणे दिसून येतो.

जरी होर्मुझ बंद करण्याची मंजुरी इराणच्या संसदेकडून मिळाली असली तरी. परंतु, रविवारी, संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य मेजर जनरल कोवसारी म्हणाले की, इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्राधिकरणाने, सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने या निर्णयाला अंतिम स्वरूप देणे आवश्यक आहे.

रशिया-अमेरिकेकडून तेल आयात वाढली
जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार असलेला भारत, त्याच्या कच्च्या तेलाच्या सुमारे 40% आणि जवळजवळ अर्धा वायू होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आयात करतो, परंतु यावरील वाढत्या संघर्षादरम्यान, भारताने आधीच एक मोठे पाऊल उचलले आहे आणि आता मध्य पूर्व पुरवठादारांपेक्षा रशिया आणि अमेरिकेकडून जास्त तेल आयात करत आहे. जूनमध्ये, रशियाकडून भारताची तेल आयात (India Oil Import from Russia) मे महिन्याच्या तुलनेत दोन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.

जागतिक व्यापार विश्लेषकांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, या महिन्यात रशिया आणि अमेरिकेतून होणारी तेल आयात पारंपारिक मध्य पूर्व पुरवठादारांच्या एकूण खरेदीपेक्षा जास्त झाली आहे. भारत दररोज २-२.२ दशलक्ष बॅरल रशियन कच्चे तेल आयात करत आहे, तर अमेरिकेतून कच्च्या तेलाची आयात जूनमध्ये ४३९,००० बॅरल प्रतिदिन झाली आहे, जी मे महिन्याच्या मागील महिन्यात २८०,००० बॅरल होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...