spot_img
अहमदनगरगडाखांच्या पाठीत तुम्ही आधी खंजीर खुपसला!; लंघे समर्थक म्हणतात, आम्ही बोलू लागलो...

गडाखांच्या पाठीत तुम्ही आधी खंजीर खुपसला!; लंघे समर्थक म्हणतात, आम्ही बोलू लागलो तर…

spot_img

विठ्ठलराव लंघे सर्थकांकडून बाळासाहेब मुरकुटे यांची पोलखोल । लंघे समर्थक म्हणतात, आम्ही बोलू लागलो तर तोंड दाखवता येणार नाही!
नेवासा । नगर सह्याद्री
राजकारणात गॉडादर लागतोच, पण त्याच्याशी प्रतारणा करायची नसते! तुम्हाला यशवंतराव गडाख हे गॉडादर भेटले म्हणून तर तुम्ही राजकारणात आले आणि आदार झाले. आमच्याबद्दल बोलणार्‍या बाळासाहेब मुरकुटे यांनी इतिहासाची पाने चाळण्याची गरज आहे. गडाखांच्या पाठीत खंजीर खुपसूनच तुम्ही राजकीय फायदा मिळवला हे विसरु नका! आम्ही बोलू लागलो तर तुम्हाला घराबाहेर पडणे अवघड होईल, तुमचे पळणे सुद्धा बंद होईल असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या समर्थकांनी दिला आहे. मुरकुटे यांनी विश्‍वासघातकी राजकारण केेले आणि त्यातूत स्वत:चा राजकीय फायदा उठवला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतरच्या सभेत बोलताना मुरकुटे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. कायम बुक्क्याचे धनी असणारे तडजोडीबहाद्दर विठ्ठल लंघे यांना यशवंतराव गडाखांनी ताकद दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. सार्‍या राजकीय पक्षांचा प्रवास करणार्‍या लंघे यांनी सार्‍यांचाच विश्‍वासघात करत गद्दारी केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ज्या गडाखांनी विठ्ठलराव लंघे यांना दिले, त्या विठ्ठलरावांनी गडाखांचा विश्‍वासघात केला. जे गडाखांचे झाले नाही ते विश्‍वासघातकी लंघे हे तुचे कधीच होऊ शकणार नसल्याने त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन बाळासाहेब मुरकुटे यांनी केले होते.

मुरकुटे यांच्या जहरी टिकेवर विठ्ठलराव लंघे यांच्या समर्थकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुरकुटे यांना राजकारणात आणणार्‍या गॉडफादरच्या (गडाख) पाठीत तुम्ही खंजीर खुपसलाय हे तुम्ही विसरला आहात काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस नेवासा तालुकाध्यक्षपदासह नेवासा बाजार समितीचे अध्यक्षपदही याच यशवंतराव गडाखांनी तुम्हाला दिले होते हेही तुम्ही विसरलात का? भाजपाकडून आमदार होण्याच्या आधी पत्नी आशाताई मुरकुटे या काँग्रेसच्या चिन्हावर जिल्हा परिषद सदस्य होत्या. तुम्ही भाजपात प्रवेश करत पक्ष बदलला आणि आमदार झाले तरीही तुम्ही तुमच्या पत्नीचा काँग्रेस पक्ष अथवा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता हेही तुम्ही विसरलात का? आमच्या नेत्यावर विश्‍वासघातकी असा आरोप करण्याआधी तुम्ही किती पक्ष बदलले आणि कोणाच्या हितासाठी बदलले हे समोरासमोर येऊन एकदा सांगा! याशिवाय तुम्हाला राजकारणात कोणी आणले? तुम्हाला गॉडफादर कोण होता हेही जाहीरपणे आपण सांगणार आहात का असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

रामकृष्णहरी म्हणायचे आणि केसाने गळा कापायचे पाप आपण करत आहात. आपण आपल्या वाचाळपणाला आवर घाला. बरळल्यागत आरोप करणे थांबवा अन्यथा आम्ही बोलू लागलो तर आपणास तोंड देखील दाखवायला जागा मिळणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...