Maharashtra Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी रात्री एका 36 वर्षीय महिलेसोबत अत्यंत भयंकर प्रकार घडला. भावकीतीलच 36 वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणाने अंगावर काटा आणणारे कृत्य केले आहे. महिलेने नकार देताच या नराधमाने या विवाहितेवर कटरने भयंकर वार केले.
या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर 280 टाके घालावे लागले आहेत. तिच्या मानेपासून ते मांडीपर्यंतच्या खोल जखमेमुळे ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अभिषेक तात्याराव नवपुते याला अटक केली आहे.
पीडित महिला शेतात काम करत असताना आरोपी अभिषेक नवपुते याने तिला फोन करून तिच्यासोबत जबरदस्तीची मागणी केली, तसेच तिच्या जावेच्या बाबतीतही अर्वाच्य बोलला. पीडितेने त्याचा फोन कट केला. संध्याकाळी ती शेतातून परत येत असताना आरोपीने पाठीमागून येऊन तिची वेणी ओढली आणि तिला जमिनीवर फेकले.
त्यानंतर तिला काही कळायच्या आत त्याने चेहऱ्यावर धारदार कटरने वार केले. महिलेने ओरडण्याचा प्रयत्न केला असता त्याने गळ्यावर वार केला आणि संपूर्ण शरीरावर सपासप वार केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अभिषेक तात्याराव नवपुते याला अटक केली आहे.