spot_img
ब्रेकिंगमहाकुंभ मेळ्यातील दुर्घटनेनंतर योगी सरकारचा मोठा निर्णय; काय-काय झाले बदल!

महाकुंभ मेळ्यातील दुर्घटनेनंतर योगी सरकारचा मोठा निर्णय; काय-काय झाले बदल!

spot_img

Mahakumbh: उत्तर प्रदेशातीलप्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक आले. त्या ठिकाणी ब्रह्म मुहूर्तावर एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी घेतला महाकुंभ मेळा परिसराचा आढावा घेतल्यानंतर काही महत्वाच्या घोषणा केल्या आहे.

महाकुंभ परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली असून, गर्दीचे योग्य व्यवस्थापन आणि भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी पास रद्द करण्यात आले असून कोणत्याही विशेष पासद्वारे वाहनांना प्रवेश मिळणार नाही.

४ फेब्रुवारीपर्यंत भाविकांना संगमावर पायी जाण्याची परवानगी असणार आहे. प्रयागराज शहरात चारचाकी वाहनांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. शहरात फक्त दुचाकी, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला प्रवेश दिला जाईल. तसेच, महाकुंभमेळा परिसर वाहनमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

महाकुंभ मेळ्यातील व्यवस्थेबाबत महत्वाचे बदल
महाकुंभ मेळा परिसर नो-व्हेहिकल झोन (वाहनमुक्त क्षेत्र)
वाहनांना व्हीव्हीआयपी पासने परिसरात प्रवेश नाही.
भाविकांच्या सुरळीत वाहतुकीसाठी एकेरी वाहतूक व्यवस्था.
बाहेरील जिल्ह्यांमधून येणारी वाहने प्रयागराजच्‍या सीमेवरच थांबवली जाणार.
४ फेब्रुवारीपर्यंत शहरात चारचाकी वाहनांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मान्सूनची पुन्हा गर्जना; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon:वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...