spot_img
अहमदनगरहोय विवेक कोल्हे आमदार होणार! राजकीय वर्तुळात खळबळ?, कोणी केले विधान पहा..

होय विवेक कोल्हे आमदार होणार! राजकीय वर्तुळात खळबळ?, कोणी केले विधान पहा..

spot_img

कोपरगाव । नगर सहयाद्री:-
कोपरगावची बाजारपेठ फुलण्यासाठी व व्यावसायिकांना मदत होण्यासाठी विवेक कोल्हे हे आमदार होतील. विधान भवन परिसरात देखील आपल्या स्थानिक कलाकुसरीचे अहिंसा केंद्राचे स्टॉल लागून दर्जेदार प्रतिसाद मिळेल. हवकाधा या व्यवसायाशी निगडित कलेला न्याय मिळून महिलांना मोठी संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन काका कोयटे यांनी यांनी केले.

राष्ट्रीय हथकरघा दिनाचे औचित्य साधून समता हॉल येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोवटे, संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी काका कोयटे म्हणाले, होतकरू आणि धाडसी युवा चेहरा म्हणून विवेक कोल्हे यांनी जनतेच्या मनात घर केल्याने त्यांच्याकडे एक आश्वासक नेतृत्व म्हणून नागरिक पाहतात, व्यापारी, उद्योजक, राजकीय नेते, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांनी हेरलेला हा अभ्यासू नेता लवकरच विधानसभेत आपला आवाज बुलंद करेल, अशी अपेक्षा सर्वांना असल्याचे ग्रातून अधोरेखित होते. येवल्याची साडी पाच हजारांना आणि आपली दहा हजाराला असे झाले तर खरेदीवर परिणाम होईल त्यामुळे आपल्याला बाजारपेठेची प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. सुदैवाने आपल्याकडून समृध्दी महामार्ग गेला आहे त्याचा फायदा आपण घेऊ शकतो, असे कोमटे म्हणाले.

यावेळी शोभनाताई ठोळे, अरुणा लोहाडे, कल्याणी गंगवाल, मुंबई विणकर सेवा केंद्राचे मनीष पवईकर, राजेश ठोळे, जैन समाजाचे पंच अशोक पापडीवाल, अमित हे आपल्या कलेतून सुबकता लोहाडे, प्रितम गंगवाल, निर्माण करतात. अहिंसा प्रेमचंद गंगवाल, हातमाग संस्थेने केलेल्या प्रयत्नांचा कारागीर प्रियंका सुपेकरआदीसह महिला भगिनी आणि नागरिक उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...