spot_img
ब्रेकिंगराज्यात आज येलो अलर्ट! तुफान पाऊस कोसळणार

राज्यात आज येलो अलर्ट! तुफान पाऊस कोसळणार

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
राज्यात सध्या अवकाळी पाऊस सुरु असून राज्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यात हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यांत आज यलो अलर्ट जारी केला आहे.

आजपासून म्हणजेच19 मे ते 25 मे दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पुढील आठवड्यापासून महाराष्ट्रातजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 22 मे रोजी कर्नाटक जवळ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 19 मे ते 25 मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह राज्यात जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यादरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’सुद्धा जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भातही काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भयंकर! राष्ट्रवादी नेत्याचा मर्डर; शरीराचे तुकडे करून नदीत फेकले..

Maharashtra Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि अमानवी घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रवादी...

राज्यत सिलिंडर ब्लास्ट! ३ मजली चाळ पत्त्यासारखी कोसळली, अनेकांचे जीव धोक्यात..

मुंबई । नगर सहयाद्री:- मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील भारत नगर परिसरात आज सकाळी एक...

शहरातली चोरटोळी जेरबंद! टोळी, दलाल आणि सोनार अडकले जाळ्यात; मोठी कारवाई

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर व भिंगार कॅम्प भागात मागील काही दिवसांत घडलेल्या...

‘अर्बन’ बँक घोटाळ्यात ट्विस्ट: ईडीने घेतला गांधी यांचा जबाब, ‘ते’ मोठे चेहरे गोत्यात येणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- तब्बल 291 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे कोसळलेल्या नगर अर्बन को-ऑप. बँकेतील...