spot_img
मनोरंजनकियारा अडवाणीसाठी यशने घेतला महत्त्वाचा निर्णय

कियारा अडवाणीसाठी यशने घेतला महत्त्वाचा निर्णय

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या प्रेग्नेंट आहे. मात्र तरीही ती शुटींगमध्ये व्यस्त आहे. लवकरच ती केजीएफ फेम यशसोबत ‘टॉक्सिक’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मात्र त्यापूर्वी यशने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकून घेतले आहे. अभिनेत्याने या चित्रपटाचे शूटिंगचे वेळापत्रक मुंबईला हलवले आहे. जेणेकरून कियारा अडवाणीला हे ठिकाण सोईस्कर ठरू शकेल.

यशने त्याच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाचे दिग्दर्शक गीतू मोहनदास आणि निर्माते वेंकट के नारायण यांना सर्व शूटिंग औपचारिकता बंगळुरूहून मुंबईत हलवण्यास सांगितले होते. यशने निर्मात्यांना सहकार्य केले आणि ते मुंबईत हलवले. त्याच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.

कियाराने आणि तिचा पती सिद्धार्थ मल्होत्राने मार्चमध्ये अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीची बातमी जाहीर केली होती. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, ‘आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट लवकरच येत आहे,’ असे सांगितले. त्यानंतर त्यांच्यावर नेटकऱ्यांसह कलारांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या समोर आलेल्या पोस्टरमध्ये यश काळ्या लेदर जॅकेट आणि टोपीमध्ये दिसत आहे. त्याच्या हातात बंदूक आहे. तर त्याच्या मागे, एक संपूर्ण शहर जळत असल्याचे पोस्टरमध्ये दिसत आहे. हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...