spot_img
ब्रेकिंगकामगार हादरले! MIDC मधील कंपनीत मोठा स्फोट; प्लँट ऑपरेटर..

कामगार हादरले! MIDC मधील कंपनीत मोठा स्फोट; प्लँट ऑपरेटर..

spot_img

Maharashtra News Today: एका रासायनिक कंपनीमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंबरनाथ एमआयडीसीमध्ये ही घटना घडली. या स्फोटामध्ये कंपनीचा प्लँट ऑपरेटर गंभीर जखमी झालला आहे. हा स्फोट झाला तेव्हा कंपनीत १० ते १२ कामगार होते. जखमी प्लँट ऑपरेटरला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी: अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील रसिनो फार्मा कंपनीत मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. या आगीत कंपनीतील प्लँट ऑपरेटर गंभीर जखमी झाला आहे. अनिल यादव असं गंभीर जखमी झालेल्या प्लँट ऑपरेटरचं नाव आहे. हा स्फोट झाला तेव्हा कंपनीत १० ते १२ कामगार काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. कंपनीच्या तळमजल्यावरील प्लँटमध्ये काम करत असताना अचानक प्लँटमध्ये स्फोट झाला.

या स्फोटामध्ये अनिल यादव पूर्णपणे भाजले असून ही घटना घडल्यानंतर कंपनीतील इतर कामगारांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. या घटनेत आणखी कुणी जखमी आहे का? याबाबतची माहिती मात्र अजूनही समोर येऊ शकलेली नाही.दुसरीकडे कंपनीतील आग विझवण्याचं काम मध्यरात्रीपर्यंत सुरूच होते. ही आग संपूर्णपणे विझल्यानंतरच कंपनीची पाहणी करून आतमध्ये एखाद्या कामगाराचा मृतदेह सापडतो का? हे पाहावं लागणार असल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अग्नीतांडव! फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १७ जणांचा मृत्यू; कुठे घडला प्रकार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गुजरात राज्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे....

घरात घुसून महिलेसोबत ‘तसले’ वर्तन; रावसाहेबवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात मद्य सेवन केलेल्या व्यक्तीने महिलेच्या घरात जबरदस्ती...

गावच्या विकासासाठी आमदार काशिनाथ दातेंनी दिला कानमंत्र; काय म्हणाले पहा…

नेप्तीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन अहिल्यानगर | नगर सह्याद्री गावा-गावातील धार्मिक एकात्मता भारतीय संस्कृतीने जोडली गेलेली आहे....

‘पारनेर ग्रामीण पतसंस्थेला ४.४३ कोटींचा नफा’

संस्थापक आ. काशिनाथ दातेंची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पारनेर...