वर्कशॉपमधून सव्वा लाखांचा माल चोरीला / एमआयडीसी पोलीस ठाण्यात कर्मचार्यावर गुन्हा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
एमआयडीसी परिसरात वर्कशॉपमधून १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या कॉपरच्या प्लेट्स चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एका कामगाराविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही घटना ८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० या कालावधीत एमआयडीसीतील ए/एल ब्लॉक, ओम फोर्सजवळ घडली. फिर्यादी विलास दादाभाऊ खुडे (वय ४२, रा. डॉनबॉस्को, सावेडी, अहिल्यानगर) यांच्या मालकीच्या वेदांत एंटरप्रायझेस या फॅब्रिकेशन वर्कशॉपमधून ३५० किलो वजनाच्या ८६ कॉपर प्लेट्स, ज्यांची किंमत १ लाख २५ हजार रुपये आहे. फिर्यादीनुसार, वर्कशॉपमधील कामगार शुभम रामदास आगळे (रा. कळसे वस्ती, निंबळक, एमआयडीसी, मूळ रा. वरखंडी, ता. राहुरी) याने फिर्यादीच्या संमतीशिवाय आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या प्लेट्स चोरल्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आडबल करत आहेत.