spot_img
अहमदनगरकाम करा अन्यथा शिवसेनेतून डच्चू; शिर्डीतील मेळाव्यात कोण काय म्हणाले?, वाचा राजकीय...

काम करा अन्यथा शिवसेनेतून डच्चू; शिर्डीतील मेळाव्यात कोण काय म्हणाले?, वाचा राजकीय रंग

spot_img

शिर्डी । नगर सहयाद्री:-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी सज्ज राहावे असे आवाहन शिवसेना पक्षाचे सचिव राम रेपाळे यांनी केले आहे. तसेच पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे काम करावे, काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले जाणार असल्याचे रेपाळे यांनी सांगितले.

शिर्डी येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात श्री रेपाळे बोलत होते. पुढील एक ते दोन महिन्यात राज्यात नगर पालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिति यांच्या निवडणुका होणार असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून राम रेपाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मित्र पक्षा सोबत युती होईल अथवा होणार नाही. परंतु सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी या निवडणुकीसाठी सज्ज राहिले पाहिजे असे आवाहन श्री रेपाळे यांनी केले आहे. पुढील काही दिवसात काम न करणाऱ्या पदाधिकारी यांना पद मुक्त केले असणार असल्याचे श्री रेपाळे यांनी सांगितले. यावेळी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंगे, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नितीन औताडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमल पुनडे, सुनीता शेळके, वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख जितेंद्र जाधव, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ, महेश देशमुख, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, भानुदास मुरकुटे, सागर बेग, यासह शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये बंद घर फोडले; अडीच लाखांचे दागिने लांबविले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - श्रीकृष्णनगर, केडगाव येथील प्लॉट क्रमांक ३० येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी...

धक्कादायक; बँक कर्मचार्‍याने १२ तोळे सोने लांबविले, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : नगरमध्ये बँक कर्मचार्‍यांने १२ तोळे सोने लंपास केल्याची प्रकार उघडकीस...

दोन लेकरांसह आईची विहिरीत उडी; तिघांचाही मृत्यू, नगरमधील घटना

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील धक्कादायक घटना जामखेड | नगर सह्याद्री रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जामखेड तालुयातील नायगाव...

बोगस मतदारांच्या आरोपावरून विखे-थोरात भिडले, काय म्हणाले पहा

शिर्डी | नगर सह्याद्री बोगस मतदानाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले...