spot_img
अहमदनगरमहिला आर्थिक विकास महामंडळाचा अधिकारी चर.. चरला; संजय गर्जे कोणाचा जावई?

महिला आर्थिक विकास महामंडळाचा अधिकारी चर.. चरला; संजय गर्जे कोणाचा जावई?

spot_img

हिलांचे शोषण अन्‌‍ पाच कोटींचा घोटाळा | देवेंद्रजी, एकट्या नगर तालुक्यात 12 हजार महिलांना गंडवले | अनेक महिलांचे शोषण करणारा संजय गर्जे कोणाचा जावई?
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण धोरणांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटांना आर्थिक मदत करणे, त्यांना सक्षम करण्यासह महिलांना रोजगाराच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबवणे, त्यांच्यासाठी उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी महामंडळ स्तरावर राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या अनुषंगाने साधन केंद्रांना सक्षम करण्याची योजना आहे. नगरमध्ये मात्र याच्या उलट घडले आहे. महिलांपेक्षा या बचतगटांवर नियंत्रण आणि समन्वय ठेवण्यासाठी महामंडळाने नियुक्त केलेला समन्वय अधिकारी संजय गर्जे याने तब्बल पाच कोटी रुपयांना महामंडळ आणि महिलांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. हे सारे करताना त्याने अनेक महिलांचे शोषण केेले असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी कर्तुत्ववान लोक संचलित साधन केंद्राच्या सिंधू वाणी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

बारा हजार महिलांचे कोट्यवधी लाटले!
नगर तालुक्यात 1200 बचत गट कार्यरत आहेत आणि या बचत गटांच्या माध्यमातून जवळपास 12 हजार महिला कार्यरत आहेत. या महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळाकडून अनेक योजना आणि अनुदान दिले जाते. नगर तालुक्यासाठी साधन केंद्र म्हणून काम करत आहे. आम्ही कर्तुत्ववान लोक संचलित साधन केंद्र चालवत असून या साधन केंद्राच्या माध्यमातून काम करत असताना नगरचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गर्जे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी काम करत असताना महिलांचे शोषण केले आणि त्याबाबत वेळोवेळी तक्रारीही झाल्या. गर्जे यांनी अनेक महिलांना त्रास दिला असून त्यांच्याकडून महिलांचे शोषण झाले आहे. मात्र, महिला बदनामीच्या भितीने पुढे यायला तयार नाहीत. मात्र, त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सौ. सिंधू वाणी यांनी केली आहे.

संजय गर्जे महिलांना म्हणतो, शर्टचे बटन वरती घेतले तर मी गुंडा. माझे पाथडत दारूचे दुकान!
संजय गर्जे हा कार्यालयात असताना आणि बाहेर बचत गटांना भेटी देताना अतिशय उर्मट आणि दादागिरीची भाषा वापरतो. माझ्या शर्टच्या बाहीचे मनगटापर्यंतचे बटन बंद असेल तर मी साहेब, आणि हेच बटन वरती घेतले तर मी गुंडा. माझे पाथडत दारुचे दुकान आहे, माझे कोणीच वाकडे करु शकत नाही, अशी धमकीची भाषा त्याने अनेक महिलांना वापरली आहे. त्याच्याकडून अनेक महिलांचे शोषण झाले असून त्याच्या गुंडप्रवृत्तीमुळे कोणी त्याच्या विरोधात बोलायला तयार नाही. त्यामुळे या गर्जेच्या विरोधात महिलांचे शोषण आणि महिलांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा नोंदवावा अशी मागणीही सौ. वाणी यांनी केली आहे.

पोलिसांनी जबाब नोंदवून कसे काय सोडले?
गर्जे याच्याबाबत अनेक गंभीर तक्रारी असताना व त्याबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी सदरबाबत तोफखाना पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. तोफखाना पोलिसांनी गर्जे याचा जबाब नोंदवला आणि त्याला सोडून दिले. खरेतर आमच्या तक्रारीत अनेक गंभीर मुद्दे असतानाही पोलिसांनी सखोल चौकशी करण्याचे सोडून त्याला सोडून कसे दिले असा प्रश्नही सौ. वाणी यांनी उपस्थित केला आहे.

रक्षाबंधन होताच करणार उपोषण!
नगरमध्ये जिल्हा समन्वय अधिकारी असताना संजय गर्जे आणि त्याच्या कृष्णकृत्याला साथ देणारी शामल कोचीवाड या दोघांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी अन्यथा रक्षाबंधन संपताच नगरमधील महिला बचत गटाच्या महिला पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सोमवार, दि. 11 ऑगस्टपासून अमरण उपोषणाला बसू असा इशारा देण्यात आला आहे.

बदली ठाण्याला तरीही नगरवर वॉच!
गर्जे याची बदली ठाणे जिल्ह्यात करण्यात आलेली असतानाही त्याचा वॉच नगरमधील कार्यालयावर कसा काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याच्या मोबाईलवर नगरच्या कार्यालयाचे सीसीटीव्ही कनेक्शन कशासाठी यासह ठाण्यात बसून रात्रंदिवस नगरच्या कार्यालयात कोण येते आणि जाते याची माहिती गर्जे का घेत असतो असा सवालही वाणी यांनी उपस्थित केला आहे.

महिलांचे शोषण करणाऱ्याला निलंबित का केले नाही?
संजय गर्जे याच्यावर महिलांचे शोषण केल्याची गंभीर तक्रार महिला आयोगासह अन्यत्र केली. त्याची दखल घेतली गेली आणि त्याच्यावर कारवाई करण्याचे सोडून त्याची ठाणे जिल्ह्यात बदली करण्यात आल्याबद्दलही तक्रारदार वाणी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आमच्या तक्रारीनंतर ठाणे येथे बदली झाली असली तरी त्याच्याकडून आजही जिल्ह्यातील महिलांना त्रास देण्याचे काम चालू असल्याचेही वाणी यांनी निवेदनात म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमधील बनावट नोटांचे रॅकेट उद्धवस्त; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त

एसपी सोमनाथ घार्गे यांची माहिती | 88 लाखांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- बनावट चलनी...

नगरमध्ये चाललंय काय? व्यापाऱ्यांची 63 लाखांची फसवणूक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- सावेडीतील संतोष हस्तीमल मावानी याने विश्वास संपादन करून मारुतीराव मिसळ...

उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना मागविले स्पष्टीकरण; प्रकरण काय?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्मशानभूमीसाठी खाजगी जमिनीचा वापर करणाऱ्या महापालिकेने जमिनीची फक्त मोजणी केली पण...

अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार; आ. संग्राम जगताप

राष्ट्रवादी रसामाजिक न्याय विभागाच्या वतीने अभिवादन अहिल्यानगर | नगर सह्याद्री महाराष्ट्रात होऊन गेलेल्या महापुरुषांच्या विचारांची दिशा...