spot_img
अहमदनगरबस प्रवासात महिलेची पर्स लांबविली

बस प्रवासात महिलेची पर्स लांबविली

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
बस प्रवासात महिलेची पर्स एका महिलेने चोरून नेली. त्यात तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण व तीन हजार रूपयांची रोकड होती. नाशिक ते अहिल्यानगर बस प्रवासादरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात महिलेविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली हरिभाऊ कपाळे (वय 43 रा. मखबलाबाद शांतीनगर, स्वास्तिक रेसिडेनिन्सी, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व त्यांची मुलगी माहेरी अहिल्यानगर येथे येण्यासाठी नाशिक येथून मंगळवारी (5 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता नाशिक ते अकलोज या बस मध्ये बसल्या होत्या. दुपारी पावणे बाराच्या सुमारास बस राहुरी येथे आल्यानंतर तेथून तीन अनोळखी महिला बसमध्ये चढल्या व त्यातील एक महिला फिर्यादीच्या शेजारी येऊन बसली. दुपारी साडेबारा वाजता बस अहिल्यानगर शहरातील सावेडी नाका येथे आली असता फिर्यादी व त्यांची मुलगी बस मधून खाली उतरली.

त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेली महिला देखील तेथे उतरली. दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांच्याकडील पर्स पाहिली असता त्यांना पर्स दिसली नाही. त्यांनी बसमध्ये जावून पाहिले असता तेथे देखील पर्स मिळून आली नाही. त्यांच्या सोबत बस मधून उतरलेली महिला मात्र रिक्षातून निघून गेली. त्या महिलेने फिर्यादीची पर्स व त्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण आणि तीन हजार रूपयांची रोकड चोरून नेली असल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (6 नोव्हेंबर) अज्ञात महिलेविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार रमेश शिंदे करत आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...