spot_img
अहमदनगरफटाके वाजवू नका म्हटल्याने प्राध्यापक महिलेला मारहाण

फटाके वाजवू नका म्हटल्याने प्राध्यापक महिलेला मारहाण

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
फटाके वाजवू नका असे म्हणाल्याचा राग आल्याने तिघांनी प्राध्यापक महिलेला मारहाण करून त्यांच्या सोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना बुधवारी (6 नोव्हेंबर) रात्री सव्वा अकराच्या सुमारास शहरात घडली. पीडित प्राध्यापक महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण सारसर, युवराज सारसर, हर्षल सारसर (सर्व रा. म्युन्सिपल कॉलनी, नालेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयित आरोपी यांनी बुधवारी रात्री फिर्यादीच्या घरासमोर फटाके वाजविले. फिर्यादी यांनी त्यांना फटाके वाजवू नका असे म्हणाल्या असता त्यांना राग आला. त्या रागातून त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लक्ष्मण सारसर याने धक्काबुक्की करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या फिर्यादीच्या भावाला देखील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ‘तुम्ही येथे राहु नका, मी येथेच फटाके वाजवेल, तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही दुसरीकडे जावून रहा, मला कोणी काही एक करू शकत नाही’ असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, त्या तिघांनी तेथून जाताना दोन तरूणांना लाकडी दांडके व लोखंडी गजाने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अग्नीतांडव! फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १७ जणांचा मृत्यू; कुठे घडला प्रकार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गुजरात राज्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे....

घरात घुसून महिलेसोबत ‘तसले’ वर्तन; रावसाहेबवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात मद्य सेवन केलेल्या व्यक्तीने महिलेच्या घरात जबरदस्ती...

गावच्या विकासासाठी आमदार काशिनाथ दातेंनी दिला कानमंत्र; काय म्हणाले पहा…

नेप्तीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन अहिल्यानगर | नगर सह्याद्री गावा-गावातील धार्मिक एकात्मता भारतीय संस्कृतीने जोडली गेलेली आहे....

‘पारनेर ग्रामीण पतसंस्थेला ४.४३ कोटींचा नफा’

संस्थापक आ. काशिनाथ दातेंची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पारनेर...