Accident News: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बांबळेवाडी येथे मालवाहू टेम्पो आणि कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील एक महिला ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.9) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की अपघातग्रस्त कार ही नाशिक येथून पुणेच्या दिशेने जात होती. तर मालवाहू ट्रक हा पुणेयेथून नाशिकच्या दिशेने जात होता.
रविवारी दुपारी ही दोन्ही वाहने डोळासणे शिवारातील बांबळेवाडी येथे आले असता दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघातझाला. यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कारमधील महिला प्राजक्ता गिरीश गिरमे (रा. सासवड, जि. पुणे) ही ठार तर वेदांत गिरीश गिरमे (वय 10) व गिरीश मधुकर गिरमे (वय 42) हे गंभीर जखमी झाले.
अपघातामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती समजताच डोळासणे पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातातील जखमींना नागरिकांनी कारच्या बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे औषधोपचारांसाठी संगमनेर येथे पाठवले होते.