spot_img
ब्रेकिंगचिमुकल्यासह महिलेने 'गोदावरी' नदीमध्ये उडी मारली

चिमुकल्यासह महिलेने ‘गोदावरी’ नदीमध्ये उडी मारली

spot_img

Maharashtra News: यंदाच्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे नदया ओसंडून वाहत आहे. सध्या जायकवाडी धरणातून 18 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे. या गोदावरी नदीपात्रात एका महिला डॉक्टरने तिच्या सहा महिन्यांच्या बाळासह उडी मारली आहे. पूजा प्रभाकर व्हरकटे असे या आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे.

ऑटो रिक्षात बसून पैठण शहरातून एका खेड्या गावात जायचे आहे, असं सांगून डॉक्टर पूजा प्रभाकर व्हरकटे या आपल्या बाळासोबत रिक्षामध्ये बसल्या होत्या. पूल आल्यानंतर रिक्षा चालकाला “मला गोदावरी नदीचे पाणी पाहायचे आहे” असे म्हणत रिक्षा थांबवली आणि काही क्षणातच आपल्या चिमुकल्या बाळासह गोदावरी नदी पात्रात पुलावरून उडी घेतली.

छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये सदरची घटना घडली आहे. याबाबत रिक्षा चालकाने तात्काळ बचाव पथक तसेच पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच बचाव पथकांनी शोध मोहिम राबवली. 2 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर महिलेचा मृतदेह सापडला असून 6 महिन्याच्या चिमुकल्याचा अद्यापही शोध लागला नाही. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...