Politics News: श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून येथे आरपीआयला उमेदवारी मिळावी. कारण गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीमध्ये येथे आमच्या पक्षाला उमेदवारी न देता इतरांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे इथून यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ला उमेदवारी द्यावी आणि तो उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भन्साळी टॉवर राहाता येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची आढावा बैठक पार पडली. बैठकीसाठी बाळासाहेब गायकवाड, राज्य सचिव विजयराव वाकचौरे, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, उत्तर युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, राहाता तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे, राहाता शहराध्यक्ष राजेंद्र पाळंदे, करण कोळगे, प्रकाश लोंढे नानाभाऊ त्रिभुवन, अश्फाक शेख, गणेश निकाळे, जितू दिवे यांच्यासह राहाता तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब गायकवाड म्हणाले, वरिष्ठ पातळीवर ना. आठवले यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत १२ जागेची मागणी पक्षाच्या वतीने ना. आठवले यांनी केली आहे. जर १२ जागा बरोबरच श्रीरामपूर मतदार संघ राखीव असून त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ही जागा मिळाली पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे. जर जागा मिळाली नाही तर विधानसभेला जोरका झटका रिपब्लिकन पक्ष दिल्याशिवाय राहणार नाही. असे यावेळी गायकवाड यांनी सांगितले.