पद्मश्री पोपटराव पवार यांनी केला सत्कार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
दुष्काळी महाराष्ट्राच्या पाण्यासाठी जास्त काम करणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी मेघदूत बंगल्यावर भेट घेऊन मुख्यमंत्री पदी नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन केले व सत्कार केला.
त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आपल्याला आगामी 5 वर्षात ग्रामविकास व दुष्काळी महाराष्ट्राच्या पाण्यासाठी जास्त काम करायचे आहे.
त्यासाठी आपल्या जलसंधारण व ग्रामविकास क्षेत्रातील अनुभव आम्हाला मदत वेळोवेळी निश्चितच उपयोगी पडेल. त्यासाठी आपणाकडून पूर्णवेळ सहकार्याची अपेक्षा ठेवतो असे ते म्हणाले.