Maharashtra Politics News: पक्षातील काही नेते आणि कार्यकर्ते अजित पवार यांच्यसोबत जाण्यास उत्सुक आहेत. हे राजकीय गणित आहे, पण अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा. त्यांच्यावर पक्षाच्या भवितव्याची मोठी जबादारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (SP) अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानाने चर्चांना उधान आले आहे. यासोबतच पक्षाने सत्तेत सहभागी व्हायचे की विरोधी बाकांवर राहायचे हा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांनी घ्यावा, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान शरद पवार यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुलै २०२३ मध्ये फुटला. पक्षाचे दोन गड पडले. अजित पवार यांच्यासोबत ४० आमदार गेले. या आमदारांसह अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) असे दोन गट निर्माण झाले. खासदार सुप्रिया सुळे एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावं. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते, त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकच आहे, त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही, असे शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे भाकरी फिरवणार असल्याची चर्चा केली जात आहे. माझे सगळे खासदार एका मताचे आहेत, आमदारांमध्ये अस्वस्थता असू शकते, मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे, पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा राजकीय भूंकप होणार का असा प्रश्न निर्माण झाला असून खासदार सुप्रिया सुळे या काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
सुप्रिया आणि अजितने एकत्र येण्यासंदर्भात ठरवावं. पक्ष उभा करताना आज जे बाजूला गेलेलं सगळे एकत्र होते, त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकचं आहे. त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझे सगळे खासदार एक मताचे आहेत. आमदारामध्ये अस्वस्थता असू शकते. मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे. पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा.शरद पवार