श्रीरामपुर। नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र विधानसभेचा रणसंग्राम जवळ आला आहे. अवघ्या काही दिवसांवर महाराष्ट्राची निवडणूक येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. मात्र श्रीरामपूर मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे.
सोमवार दि. २८ रोजी सकाळी. १0 वाजता राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बेग उमेदवारी अर्ज भरणार आहे. शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय वार्ड नं. ७ येथून भव्य अशी रॅली देखील आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थितीत असे राहावे असे आवाहन राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रीरामपूर मतदारसंघात तिरंगी लढत होणार
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ इच्छुकांच्या गर्दीमुले चर्चेत आला होता. नुकतीच काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत हेमंत ओगले यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला. त्यामुळे विद्यमान आमदार लहू कानडे हे प्रचंड नाराज असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लहू कानडे हाती धनुष्यबाण घेत विधानसभेच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यामुळे श्रीरामपूर मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याची चर्चा आहे.