spot_img
ब्रेकिंगपावसाचे जोरदार पुनरागमन होणार? 'या' जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार; हवामान खात्याची मोठी अपडेट

पावसाचे जोरदार पुनरागमन होणार? ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार; हवामान खात्याची मोठी अपडेट

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
भारतीय हवामान खात्याने आज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात सोमवारी पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, आगामी तीन-चार दिवसांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसणार आहेत.

सध्या दक्षिण बांग्लादेशात कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, येत्या 24 तासांत ही प्रणाली वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची अशीच स्थिती राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे हवामान खात्याने आवाहन केले आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळमध्येही जोरदार पाऊस पडू शकतो. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...

तरुणांना खुशखबर! एसटी महामंडळात मेगाभरती; १७ हजार जागा, पगारही…

17,450 चालक-सहाय्यक पदांसाठी कंत्राटी भरती, 30 हजार रुपये पगार! नगर सह्याद्री वेब टीम महाराष्ट्र राज्य...

अय…पैसा तुमच्या बापाचा नाही; भरसभागृहात रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापलं कारण आले समोर…

जामखेड / नगर सह्याद्री सोशल मीडियावर आमदार रोहित पवारांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे....

मार्केटयार्डमध्ये भीषण आग; लाखोंचे साहित्य जाळून खाक

दीड लाखांचे नुकसान, वर्षानुवर्षांची बिले जळून खाक! अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मार्केटयार्डमधील जयप्रकाश कस्तुरचंद कटारिया...