Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचे पैसे जमा झाले आहेत. दरम्यान, आता महिला मार्चचा हप्त्याची वाट पाहत आहे. आज मार्चचा हप्ता येण्याची शेवटची तारीख आहे.
लाडक्या बहिणींना १२ तारखेपर्यंत फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता येणार असल्याचे सांगितले होते. आता मार्चचा हप्ता येण्यासाठी शेवटचे काही तास उरले आहेत. आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे. ७ मार्च ते १२ मार्चपर्यंत हे पैसे दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात ३००० रुपये देण्यात येणार आहे. महिला दिनाच्या मूहूर्तावर फेब्रुवारीचा हप्ता दिला होता. ७ मार्च ते १२ तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता देण्यात येणार आहे. दोन टप्प्यांमध्ये हे पैसे दिले जाणार असल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले होते.
आज १२ मार्च आहे. त्यामुळे आजच्या दिवसात सर्व महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येण्यास विलंब झाला आहे. महिलांच्या अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच पैसे येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, आता लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ९ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. या महिलांना पैसे मिळणार नाहीत.याचसोबत अजूनही महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु आहे. यामध्ये अपात्र झालेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं. अर्थसंकल्पात याबाबत घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र, अशी कोणतीही घोषणा न झाल्याने महिलांमध्ये निराशा झाली आहे.