spot_img
ब्रेकिंगगेममुळे ‘गेम’ होणार? कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे मंत्रीपद धोक्यात!; राष्ट्रवादीकडून कारवाईचे संकेत

गेममुळे ‘गेम’ होणार? कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे मंत्रीपद धोक्यात!; राष्ट्रवादीकडून कारवाईचे संकेत

spot_img

राष्ट्रवादीकडून कारवाईचे संकेत । राजीनाम्याच्या चर्चेला उधाण
मुंबई । नगर सहयाद्री:-
विधिमंडळाच्या सभागृहात मोबाइलवर कार्ड गेम खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी योग्य निर्णय घेतला जाईल असे सांगत स्पष्ट संकेत दिले, त्यामुळे कोकाटेंच्या मंत्रिपदावर गदा येण्याची शक्यता आहे.

अलीकडेच विधिमंडळात माणिकराव कोकाटे यांचा कार्ड गेम खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवारांनी सोशल मीडियावर शेअर केला, त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शेतकऱ्यांवर संकट असताना मंत्री मात्र खेळण्यात व्यस्त, असा आरोप विरोधकांनी करत सरकारला घेरले.

सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कृषीमंत्री कोकाटेंचा व्हायरल व्हिडीओ या दोन मोठ्या घटनांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संतप्त सूर लावत, दोन्ही घटनांचा निषेध केला आणि पक्षाकडून योग्य ती कारवाई होईल, असे सूचक विधान केले.लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर सूरज चव्हाण यांनी केलेली मारहाण अत्यंत निंदनीय असल्याचं तटकरे म्हणाले.

पक्ष त्याची गांभीर्याने नोंद घेईल. दुसरीकडे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कार्ड गेम व्हिडीओवरून उसळलेल्या संतापालाही तटकरे यांनी दुजोरा दिला. शेतकऱ्यांवर आज संकट कोसळलं आहे. मे महिन्यात पाऊस आला, त्यामुळे पेरण्या खोळंबल्या. शेतकरी संकटात असताना कृषीमंत्र्यांनी योग्य पद्धतीने शेतकऱ्यांसाठी सतत कार्यरत राहायला हवं. त्यांच्याकडून आता जे घडलं, ते अयोग्य घडलं. पक्ष त्यांच्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेईल. असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चार खासदार हनी ट्रॅपचा जाळ्यात! संजय राऊतांचा ट्विट बॉम्ब, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यातील राजकारण पुन्हा एकदा हनी ट्रॅप प्रकरणामुळे ढवळून निघाले असून, शिवसेना...

थाटामाटात लग्न पार पडले अन् ‘नवरदेवा’वरच गुन्हा दाखल झाला! काय आहे प्रकरण?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीशी बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी...

मुख्याध्यापकाकडे मागीतली पाच लाखांची खंडणीची; ‘या’ संस्थेच्या चेअरमनसह दोघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात एका शिक्षकाने शाळेच्या चेअरमन आणि स्वीकृत सदस्यावर...

209 बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटांतील ११ आरोपींची 19 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

मुंबई | नगर सह्याद्री:- मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर 2006 रोजी 11 मिनिटांत सात ठिकाणी झालेल्या...