spot_img
ब्रेकिंगलाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार?, कुणी दिली ग्वाही?, वाचा..

लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार?, कुणी दिली ग्वाही?, वाचा..

spot_img

मुंबई \ नगर सहयाद्री:-
राज्य सरकारकडून राबवली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेच आहे. विशेष बाब म्हणजे, या योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत देखील चांगला फायदा झाला आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूव 1500 ऐवजी 2100 रुपये मानधन लाडक्या बहिणींना देऊ अशी घोषणा केली होती. मात्र अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा झाले नाहीत. हे 2100 रुपये कधीपासून मिळणार? या प्रश्नावर राजकीय चर्चा आणि गदारोळ सुरु आहे.

असं असताना आता लाडकी बहीण योजनेचे मानधन एकवीसशे रुपये करण्यासाठी स्वत: प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी दिली आहे. दैवज्ञ भवनमध्ये शुक्रवारी सांगली जिल्हा शिवसेना (शिंदे) महिला आघाडीच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी डॉ. नीलम गोर्हे बोलत होत्या.

डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेचा महिलांंना चांगला फायदा झाला आहे. महिलांनी बचत गट काढून लहान, लहान उद्योग सुरू केले आहेत. त्यांना बँकांनीही सहकार्य दिले आहे. महिलांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत, त्यांचा सामान्य जनतेला फायदा करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे गोऱ्हे म्हणाल्या.

पुढे बोलताना म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेचे मानधन एकवीसशे करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. सांगली जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, यासाठी आवश्यक ते पाठबळ आपण देऊ, असाही नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...

ग्रामपंचायत अधिकारी पठाण यांच्यावर हल्ला! ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा काम बंदचा इशारा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती शकीला पठाण...