spot_img
ब्रेकिंगलाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का?; 'बड्या' नेत्याने दिली स्पष्ट माहिती..

लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का?; ‘बड्या’ नेत्याने दिली स्पष्ट माहिती..

spot_img

Ladki Bahin Yojana:महायुती सरकारची लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणूकीत गेमचेंजर ठरली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत सध्या १५०० रुपये दिले जातात.या योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. दरम्यान, अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे २१०० रुपये कधी देणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. आता लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांबाबत राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?
अनेक योजना देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जनतेला पोहचल्या आहेत. या योजनांचा योग्य पद्धतीने लाभ घ्यायला हवा. लाडकी बहीण योजना सुरु आहे. या योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले जाते. परंतु माझी सर्व बहि‍णींना विनंती आहे की, लाडकी बहीण योजना बंद होणार होणार नाही, तुम्ही काळजी करु नका.

वाढीव हप्ता देण्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल. जे काही २१०० रुपये जाहीर केलेले ते योग्यवेळी आपल्याला देवेंद्रभाऊ देणार. आपला भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे. हे लक्षात ठेवा. त्यामुळे देवेंद्र भाऊ योग्य वेळी निर्णय घेतील. तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करतील, असं शिवेंद्रराजे यांनी सांगितलं.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जनतेसाठी योजना तयार केल्या आहेत. परंतु अनेक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ पोचल नाही. या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचल नाही. लाभ कसा घ्यावा याबाबत माहितीनसते. त्यामुळे थोडा वेळ सरकारी कार्यालयात जाऊन याची माहिती घ्यावी, असे आवाहन शिवेंद्रराजे यांनी केले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...